Ex-Girlfriend ला कारमधून रस्त्यावर फेकलं! कुबड्या घेऊन कोर्टात पोहोचला; 'या' खेळाडूचं करियर धोक्यात

Nick Kyrgios pleaded guilty to assault ex girlfriend: तो कोर्टात आला तेव्हा त्याच्याबरोबर त्याची सध्याची गर्लफ्रेण्ड, तिची आई आणि भाऊ देखील होता. त्याने एक्स गर्लफ्रेण्डने लावलेले सर्व आरोप मान्य केले आहेत.

Updated: Feb 3, 2023, 05:37 PM IST
Ex-Girlfriend ला कारमधून रस्त्यावर फेकलं! कुबड्या घेऊन कोर्टात पोहोचला; 'या' खेळाडूचं करियर धोक्यात
Nick Kyrgios pleaded guilty to assault ex girlfriend

Nick Kyrgios pleaded guilty to assault ex girlfriend: ऑस्ट्रेलियातील स्टार टेनिसपटू निक किर्गियोस (Nick Kyrgios) पुन्हा एकदा वादात अडकला आहे. किर्गियोस आपल्या खेळातील आक्रमतेऐवजी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. किर्गियोसच्या अशा वागण्यामुळेच त्याची 'बॅड बॉय' म्हणजेच नकारात्मक इमेज तयार झाली आहे. सध्या आपल्या एक्स-गर्लफ्रेण्डसंदर्भातील एका प्रकरणामुळे किर्गियोसला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागत आहे. एक्स गर्लफ्रेण्डने किर्गियोसवर मारहाण केल्याचे आरोप लावले आहेत. किर्गियोसनेही कोर्टासमोर आपली चूक मान्य करत सर्व आरोप स्वीकारले आहेत.

निक किर्गियोसने शुक्रवारी कोर्टात हजेरी लावली. एक्स गर्लफ्रेण्ड चियारा पासारीने (Chiara Passari) किर्गियोसवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण 2021 मधील आहे. परासीने आरोप केला आहे की किर्गियोसने एका वादादरम्यान तिला गाडीमधून उतरताना जोरात धक्का दिला. किर्गियोसने धक्का दिल्याने माझ्या खांद्याला आणि गुडघ्यांना मोठी दुखापत झाली होती, असा दावाही परासीने केला आहे. या प्रकरणानंतर दोघांचं ब्रेकअप झालं होतं. या घटनेच्या 10 महिन्यानंतर परासीने पोलिसांकडे किर्गियोसविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nick Kyrgios (@k1ngkyrg1os)

27 वर्षीय किर्गियोस याच प्रकरणामध्ये गुरुवारीही कोर्टात हजर झाला होता. त्याच्याबरोबर यावेळेस त्याची सध्याची गर्लफ्रेण्ड कोस्टीन हाटजी आणि तिचा भाऊ तसेच आईसुद्धा उपस्थित होती. सध्या किर्गियोस स्वत: गुडघ्यासंदर्भातील समस्यांचा सामना करत आहे. त्याने मानसिक आरोग्याचं कारण देत कोर्टाकडे वेळ मागितला होता. मात्र कोर्टाने त्याची ही मागणी फेटाळली. त्यामुळे कुबड्यांचा आधार घेत किर्गियोस कोर्टात आला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nick Kyrgios (@k1ngkyrg1os)

जागतिक क्रमवारीमध्ये सध्या 20 व्या क्रमांकावर असलेल्या किर्गियोस सध्या कोस्टीन हाट्जीला डेट करत आहे. अनेकदा तो कोस्टीनबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.