मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय नेमबाज खुश सीरत कौर संधूने (Khush Seerat Kaur Sandhu) स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, ती अवघ्या 17 वर्षांची होती. मृत्यूसमयी ती पंजाबमधील (Punjab) फरीदकोट (Faridkot) येथील तिच्या घरी होती. खुश सीरत कौर संधूने 9 डिसेंबर रोजी स्वतःला गोळी मारली. तिच्या या टोकाच्या पाऊलामुले कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकलेली खुश सीरत कौर संधू तिच्या शेवटच्या कामगिरीबद्दल निराश होती. त्यामुळे तिने असं टोकाचं पाऊल उचल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. खुश सीरत कौर संधूच्या आत्महत्याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
फरीदकोट शहर पोलिसांचे एसएचओ हरजिंदर सिंग यांनी एका वेबसाईटला सांगितलं की, 'गुरुवारी सकाळी, आम्हाला कंट्रोल रूममधून कॉल आला की, फरीदकोटच्या हरिंदर नगर येथील गल्ली क्रमांक-4 मध्ये राहात असलेल्या एका मुलीने स्वत:वर गोळी झाडली.' माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
आता याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी खुश सीरत कौर संधूचं पार्थिव शरीर कुटुंबाकडे सोपावलं आहे. खुश सीरत कौर संधूने आत्महत्येपूर्वी सुसाईट नोट लिहीलेली नाही. पण तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, खुश सीरत कौर संधू दिल्लीत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिच्या कामगिरीबद्दल खूप नाराज होती.
कोचकडून दुःख व्यक्त
खुश सीरत कौर संधूने 4 वर्षांपूर्वी तिच्या करियरला सुरूवात केली. खुश अत्यंत हुशार मुलगी होती. तिने जे केलं ते फार धक्कादायक असल्याचं खुशच्या कोचने सांगितलं आहे.