'...म्हणून कमरेवर बांधलं खेळणं, ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या कोरियन शूटरची कहाणी आली जगासमोर

Korean shooter Kim Yeji:  कोरिया रिपब्लिकची नेमबाज किम ये जी हिने महिलांच्या 10 मिटर एअर पिस्टल स्पर्धेत सिल्व्हर मेडलं जिकंल. तिचा हा विजय वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलाय. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 8, 2024, 11:13 AM IST
'...म्हणून कमरेवर बांधलं खेळणं, ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या कोरियन शूटरची कहाणी आली जगासमोर title=
ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या कोरियन शूटरची कहाणी

Korean shooter Kim Yeji: तुम्ही ऑलिम्पिक 2024 दरम्यान सोशल मीडिया पाहत असाल तर तुम्हाला खूप भन्नाट अॅथलिट पाहायला मिळाले असतील.  तुर्कीचा एअर पिस्तूल नेमबाज युसूफ डिकेक (Yusuf Dikec)! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये डिकेकने  10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं.डावा हात खिशात टाकून उजव्या हाताने गोळ्या झाडत सहजपणे 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स टीम स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं. यानंतर जगभरात याची चर्चा झाली. आता अशीच चर्चा पुन्हा एकदा होऊ लागलीय. कोरिया रिपब्लिकची नेमबाज किम ये जी हिने महिलांच्या 10 मिटर एअर पिस्टल स्पर्धेत सिल्व्हर मेडलं जिकंल. तिचा हा विजय वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलाय. 

बॅंडवर खेळण्यातील हत्ती 

किम ये जीने तिच्याच देशाची ऑलिम्पिक विलेज रुममेट ओह ये जिनला हरवलं होतं. जिने 243.2 चा ऑलिम्पिक रेकॉर्ड बनवला होता. सोशल मीडियावर किमचे फोटो जगभरात व्हायरल होतायत.  तिच्या आणखी एका गोष्टीने साऱ्या जगाचे लक्ष्य वेधून घेतले आहे. ते म्हणजे किमचा वेस्ट बॅंड. यावर एक खेळण्यातील हत्ती होता.  पण एखादा खेळाडू असा वेस्ट बॅंड घालून ऑलिम्पिक खेळायला का येऊ शकतो? असा प्रश्न सोशल मीडियात विचारला जाऊ लागला. याचे उत्तर आता नेटकऱ्यांना मिळाले आहे. 

5 वर्षे जुना रेकॉर्ड

किम ये जीच्या 5 वर्षाच्या लेकीने तिला हत्तीचा वेस्ट बॅंड दिला होता, जी घरी बसून आपली आई जिंकण्याची वाट पाहत होती. दक्षिण कोरियाई निशाणेबाज किमने गेल्या मेमध्ये 5 वर्षे जुना रेकॉर्ड तोडला. या ऐतिहासिक विजयानंतर तिने आपल्या शांत प्रतिक्रियेमुळे जगाला आश्चर्याचा धक्का दिला. 

कूल पद्धतीने रेंजवर नियंत्रण

31 वर्षाच्या वयात ब्रेकआऊट स्टार शार्पशूटरने रौप्य पदक जिंकलच. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने जगासमोर स्वत:चे उदाहरण ठेवले. मागच्या आठवड्यात पहिल्यांदाच ऑलिम्पियन किम ये जीने कूल पद्धतीने रेंजवर ताबा मिळवला. चेटेउरौक्सच्या ऑलिम्पिक शूटींग सेंटरमध्ये नेमबाज किम ये जीने आपला अल्ट्रा फिट आणि स्लीक शूटर चष्मादेखील फ्लॉंट केला. 

नवा रेकॉर्ड

10 मीटर एअर पिस्टल वर्गात तिने रशियन शार्पशूटर विटालिना बत्साराशकिनाने बनवलेला 240.3 चा आधीचा रेकोर्ट तोडला. 241.3 स्कोअर करण्यात किम यशस्वी ठरली. तिच्या टीममधील सहकारी ओह येजिने तिला 243.2 स्कोरने मात दिली आणि सुवर्ण पदक जिंकत एक नवा रेकॉर्ड केला. 

'हेलो किटी'

अशाप्रकारे नुकतीच एक महिला शूटरची क्यूट रायफल चर्चेत आली होती. खेळाच्या महायुद्धात कोणाची रायफल क्यूट असणे हे ऐकून विचित्र वाटू शकते. पण चीनी नेमबाज झांग कियोनग्यूने पॅरिस ऑलिम्पित 2024 मध्ये स्पर्धकाने आपल्या रायफलवर हेलो किटी, डिअर असे स्टिकर लावले होते. त्यामुळे त्या रायफलचे फोटो सोशल मीडियात चर्चेत आले.