Video : Olympic 2024 शर्यतीत 0.005 सेकंदांच्या फरकानं 'या' धावपटूनं गमावलं गोल्ड मेडल; कोणी मारली बाजी?

Olympic 2024 : तो वाऱ्याच्या वेगानं धावला आणि... अखेरच्या क्षणी Finish Line वर इतके खेळाडू.... पण तरीही तोच कसा जिंकला? पाहा थरारक व्हिडीओ...   

सायली पाटील | Updated: Aug 5, 2024, 01:43 PM IST
Video : Olympic 2024 शर्यतीत 0.005 सेकंदांच्या फरकानं 'या' धावपटूनं गमावलं गोल्ड मेडल; कोणी मारली बाजी?  title=
Olympic 2024 Noah Lyles Won The 100m Race Even Though Thompson Foot Crossed The Line First

Olympic 2024 : ऑलिम्पिकच्या इतिहासात आजवर विविध खेळांमध्ये जगाच्या पाठीवरील अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी करत संपूर्ण जगात स्वत:ची अशी नवी ओळख प्रस्थापित केली. अशा या ऑलिम्पिकमध्ये नुकतीच एक अशी शर्यत पार पडली, जी पाहून संपूर्ण क्रीडाविश्व अवाक् झालं. ही होती पुरुषांची 100 मीटरसाठीची शर्यत. ज्यामध्ये वाऱ्याच्या वेगानं पळ काढत एका खेळाडूनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. 

ऐतिहासिक कामगिरी... 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या नोआ लाईल्सनं आपल्या खेळाच्या आणि जिद्दीच्या बळावर अविस्मरणीय कामगिरी केली असून, त्यानं पुरूषांच्या 100 मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. या विजयासह जगातील सर्वात वेगवान धावपटू म्हणूनही त्याला बहुमान देण्यात आला. या शर्यतीमध्ये अवघ्या 0.005 सेकंदांच्या फरकानं जमैकाच्या किशाने थॉम्पसन या खेळाडूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं, त्यामागोमाग अमेरिकेच्याच फ्रेड केर्ली यानं कांस्य पदकाची कमाई केली. 

हेसुद्धा  वाचा : ...म्हणून मी तसाच मेडल शूटआऊटमध्ये उतरलो; Olympic च्या Cool Guy नं सांगितलं खरं कारण

 

अंगावर काटा आणणाऱ्या आणि उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या या सामन्यामध्ये खेळाडूंच्या गुणतालिकेत अवघ्या काही अंशांचाच फरक पाहायला मिळाला. अधिकृत आकडेवारीनुसार नोआ लाईल्सनं 9.784 सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली आणि हीच त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. तर, थॉम्पसननं ही शर्यत 9.789 सेकंदांत पूर्ण करत दुसरं स्थान मिळवलं. या दोन्ही खेळाडूंमध्ये अवघ्या 0.005 सेकंदांचा फरक आढळला आणि याच कारणामुळं ही शर्यत खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरली.

शर्यतीचा अंतिम निकाल... 

गोल्ड: नोआ लाइल्स (युएसए) - 9.784s
सिल्वर: किशन थॉम्पसन (जमैका) - 9.789s
ब्रॉन्ज: फ्रेड केर्ली (युएसए) - 9.810s

डोळ्यांची पापणीही लवत नाही, इतक्या प्रचंड वेगानं धावपटूंनी वेग घेतला आणि काही मिनिटांतच अंतिम रेषा गाठली इथंसुद्धा वायुवेगानं सरशी घेत त्यांच्यापैकीच एकानं ही शर्यत जिंकली आणि खऱ्या अर्थानं यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली.