...म्हणून मी तसाच मेडल शूटआऊटमध्ये उतरलो; Olympic च्या Cool Guy नं सांगितलं खरं कारण

Turkish Shooter Secrate Behind Cool Posture: जगभरामध्ये ऑलिम्पिकमधील हा एकमेव इव्हेंट ठरला जिथे सुवर्णपदकापेक्षा रौप्यपदक विजेत्या स्पर्धकाची जगभरात चर्चा झाली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 5, 2024, 02:08 PM IST
...म्हणून मी तसाच मेडल शूटआऊटमध्ये उतरलो; Olympic च्या Cool Guy नं सांगितलं खरं कारण title=
त्याने एका मुलाखतीत केला खुलासा

Turkish Shooter Secrate Behind Cool Posture: ऑलिम्पिकमध्ये सामान्यपणे सुवर्णपद विजेत्यांची सर्वाधिक चर्चा असते. मात्र यंदाच्या पर्वामध्ये याला एक अपवाद ठरला आहे तो म्हणजे तुर्कीचा एअर पिस्तूल नेमबाज युसूफ डिकेक (Yusuf Dikec)! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये डिकेकने त्याची साथीदार सेव्हल इलायदा तरहानसह (Sevval Ilayda Tarhan) 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं. या सिलव्हर मेडलची जगभरात चर्चा होण्यामागील कारण ठरलं ते डिकेकचा या फेरीदरम्यानचा कूलनेस! तुर्कीमधील शूटरने जणू काही मॉर्निंग वॉकला आल्याप्रमाणे ट्राऊजर, व्हाइट कॉलरलेस टी-शर्ट अशा अवतारामध्ये साधा रोजच्या वापरातील चष्मा घालून आला. डावा हात खिशात टाकून उजव्या हाताने गोळ्या झाडत सहजपणे 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स टीम स्पर्धेत रौप्यपदक जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या या स्वॅगचा परिणाम असा झाला आहे की सध्या युसूफ डिकेक (Yusuf Dikec) हा इंटरनेटवर सर्वाधिक सर्च होत असलेल्या व्यक्तींपैकी एक ठरला आहे.

...म्हणून मी तसाच स्पर्धेत सहभागी झालो

पदक जिंकल्यानंतर पुन्हा मायदेशी परल्यानंतर युसूफ डिकेकने त्याच्या सहकाऱ्याबरोबरच तुर्कीमधील अंदोलू या वृत्त संस्थेशी संवाद साधला. यावेळेस त्याला स्पर्धेदरम्यान असा सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे कोणत्याही अतिरिक्त गोष्टींचा म्हणजेच शुटींग गेअर, स्पेशल गॉगल वगैरेचा वापर न करता का सहभागी झाला होता? अशा अर्थाचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना युसूफ डिकेकने, "खरं तर मी ज्या पद्धतीने उभा होतो ती माझ्यासाठी सर्वात सोयीस्कर पोझिशन होती. त्या पोझिशनमध्ये माझं शरीर सर्वात स्थिर होतं," असं उत्तर दिलं. 

एवढी चर्चा होईल असं वाटलं नव्हतं

पुढे बोलताना 51 वर्षीय युसूफ डिकेकने बाहेरुन मी जितका शांत आणि संयमी वाटत होता तितकाच गोंधळ माझ्या मनात सुरु होता असंही प्रांजळपणे मान्य केलं. "जरी मी बाहेरुन फार शांत वाटत होतो तरी माझ्या मनात वादळ सुरु होतं," असं युसूफ डिकेक म्हणाला. आपल्या अशा लूकची एवढी चर्चा होईल असं कधी वाटलंही नव्हतं अशी कबुली त्याने दिली. "या लूकचा एवढा गवगवा होईल असा स्वप्नातही विचार केला नव्हता," असं सांगताना युसूफ डिकेकने आपल्याला सर्वात सोयीस्कर वाटेल अशी पोझिशन मी घेतली आणि शूट केलं, असा खुलासा केला. 

नक्की पाहा >> PHOTOS: गुप्तांगामुळे Olympic 2024 मधून बाहेर! मेडलच्या शर्यतीत त्याच्यासोबत असं काही घडलं की...

पाचवं ऑलिम्पिक

अनेकांना ठाऊक नसेल पण युसूफ डिकेकचं हे पाचवं ऑलिम्पिक आहे. यापूर्वी त्याने 2008, 2012, 2016 आणि 2020 च्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला आहे. युसूफ डिकेकने यापूर्वी युरोपीयन चॅम्पियनशीप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये पदकं पटकावली आहेत. त्याने मेडटेरियन गेम्स तसेच इस्लामिक सॉलिडॅरिटी गेम्समध्येही अनेक पदकं कमावली आहेत.