निवृत्तीआधी गेलला हा विक्रम करण्याची संधी

वेस्टइंडिजचा विस्फोटक बॅट्समन ख्रिस गेल याने एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे.

Updated: Feb 18, 2019, 10:09 PM IST
निवृत्तीआधी गेलला हा विक्रम करण्याची संधी title=

मुंबई : वेस्टइंडिजचा विस्फोटक बॅट्समन ख्रिस गेल याने एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. गेल आगामी वर्ल्ड कप खेळल्यानंतर निवृत्ती घेणार आहे. त्यामुळे गेलच्या क्रिकेट कारकिर्दीतील ही वर्ल्ड कप स्पर्धा एक खेळाडू म्हणून शेवटची असणार आहे. जाता जाता आपल्या टीमला चांगली कामगिरी करुन वर्ल्ड कप जिंकवून देण्याचा मानस गेलचा असेल. ख्रिस गेलला या सोबतच एक विक्रम करण्याची संधी देखील आहे. त्याने जर हा विक्रम केला तर असा विक्रम करणारा तो ब्रायन लारा नंतरचा वेस्ट इंडिजचा दुसरा खेळाडू ठरेल.

ख्रिस गेलला निवृत्त होता होता, एक विक्रम करता येऊ शकतो. गेलने आतापर्यंत २८४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३७.१७ च्या सरासरीने ९,७२७ रन केल्या आहेत.  म्हणजे त्याला १० हजार रन पूर्ण करण्यासाठी अवघ्या २७३ रनची गरज आहे.  आणि या धावा करण्यासाठी गेलकडे पर्याप्त वेळ आहे. वेस्ट इंडिजची टीम वर्ल्ड कप आधी मायदेशात इंग्लंडविरुद्ध ५ वनडे सामन्यांची सीरिज खेळणार आहे. यानंतर वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्यामुळे ख्रिस गेल सारख्या विस्फोटक बॅट्समनला आपल्या १० हजार रन पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या २७३ रन करणं फारसं कठीण जाणार नाही.

आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त १३ बॅट्समनना १० हजार रनचा टप्पा ओलांडता आला आहे. या यादीत ५ भारतीय, ४ श्रीलंकन तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका,  पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी एका बॅट्समनचा समावेश आहे. गेलने १० हजार रनचा टप्पा पार केल्यास, तो वेस्ट इंडिजचा दुसरा आणि जगातील १४वा खेळाडू ठरेल.