पदकासोबतच पेसची प्रमुख ५०मध्ये वापसी

टेनिस विश्वातील अनुभवी खेळाडू लियांडर पेसने न्यूपोर्ट बीचवर चॅलेंजर किताब तर, जिंकलाच पण, त्याचसोबत प्रमुख ५० खेळाडूंमध्येही पुन्हा एकदा वापसी केली आहे. सध्या तो १४ व्या पायरीवरून उडी मारून थेट ४७व्या स्थानावर पोहोचला आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 29, 2018, 11:17 PM IST
पदकासोबतच पेसची प्रमुख ५०मध्ये वापसी title=

नवी दिल्ली : टेनिस विश्वातील अनुभवी खेळाडू लियांडर पेसने न्यूपोर्ट बीचवर चॅलेंजर किताब तर, जिंकलाच पण, त्याचसोबत प्रमुख ५० खेळाडूंमध्येही पुन्हा एकदा वापसी केली आहे. सध्या तो १४ व्या पायरीवरून उडी मारून थेट ४७व्या स्थानावर पोहोचला आहे. 

पेसने अमेरिकेच्या जेम्स सेरेटानी हिच्यासोबत न्यूपोर्ट बीच टूर्नामेंट जिंकली. तसेच, रॅंकींगमध्ये १२५ वा क्रमांक पटकावला. या आठवड्यात तो १२५००० डॉलर इतके प्रचंड इनाम असलेला डल्लास टुर्नामेंट खेळणार आहे. या वेळी त्याच्यासोबत इग्लंडची सालिस्बरी मैदानात भागिदारी करेन.

रोहन बोपन्ना युवा रॅंकींगमध्ये २०व्या स्थानावर आहे. तर, दिविज शरण करिअरच्या सर्वश्रेष्ठ ४५व्या रॅंकीगवर आहे. युकी भांबरी आठव्या स्थानावरून ११८वर पोहोचली आहे. रामकुमार रामनाथन १४०व्या, सुमित नागल २१८व्या आणि प्रग्नेश गुणेश्वरन २४४व्या स्थानावर आहे.