Pak vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक

ICC T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Updated: Nov 11, 2021, 11:30 PM IST
Pak vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक title=

दुबई : ICC T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात खेळला गेला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आधी बॅटींग करणाऱ्या पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर 177 धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स राखत हा सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकत फायनलमध्ये धडक दिली आहे. (Australia Beat Pakistan By 5 Wickets)

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 4 बाद 176 धावा केल्या. त्याच्याकडून मोहम्मद रिझवान आणि फखर जमान यांनी अर्धशतके झळकावली. रिझवान 52 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 67 धावा करून बाद झाला. फखर जमानने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 32 चेंडूंत त्याने नाबाद 55 धावा केल्या. बाबर आझमने 34 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 38 धावांत 2 बळी घेतले. पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांनीही 1-1 विकेट घेण्यात यश मिळवले.

ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरने 49 धावा केल्या. तर मार्शने 28 रन केले. स्टोईनिसने (Marcus Stoinis) ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. तर वेडने (Matthew Wade) त्याला उत्तम साथ दिली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 5 विकेट्सने जिंकत आता फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यांचा सामना आता न्यूझीलंड सोबत होणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टोईनिसने 40 तर मॅथिव वेडने 41 रन्सची जबरदस्त खेळी केली.