Babar Azam, NZ vs PAK : कराचीच्या मैदानावर 'बाबर' शहँशाह; 16 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!

Babar Azam break Mohammad Yousuf's record: पाकिस्तानच्या पहिल्या डावात बाबरने 13 धावा करताच बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. बाबर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये...

Updated: Dec 26, 2022, 07:53 PM IST
Babar Azam, NZ vs PAK : कराचीच्या मैदानावर 'बाबर' शहँशाह; 16 वर्षांचा रेकॉर्ड मोडला! title=
Babar Azam, NZ vs PAK

Pakistan vs New Zealand, 1st Test: न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात (Pakistan vs New Zealand, 1st Test) न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर असल्याचं दिसतंय. पहिल्याच दिवशी अनेक रेकॉर्ड मोडीस काढल्याचं दिसून आलं. या सामन्यात पाकिस्तानचा स्टार खेळाडू आणि कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) टीकाकारांना आपल्या बॅटने सडेतोड उत्तर दिलंय. पहिला दिवस गाजवला तो बाबर आझमने... न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धु धु धुतलंय. (PAK vs NZ 1st Test Babar Azam breaks 16 years old Mohammad Yousuf record)

पाकिस्तानच्या पहिल्या डावात बाबरने 13 धावा करताच बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. बाबर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात (Most runs in calendar year) म्हणजेच यंदाच्या वर्षात पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. बाबरने ही इनिंग खेळत मोहम्मद युसूफचा (Mohammad Yousuf) विक्रम मोडीत काढला. 2006 मध्ये मोहम्मद युसूफ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 2435 धावा करण्यात यशस्वी ठरला होता.

आणखी वाचा - Babar Azam : बाबर आझम पाकिस्तानच्या टी 20 टीमची कॅप्टन्सी सोडणार?

मोहम्मद युसूफचा रेकॉर्ड (Babar Azam breaks Mohammad Yousuf Record) ब्रेक करत बाबर आझमने अव्वल स्थान प्राप्त केलंय. तसेच कॅप्टन म्हणून बाबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील (International cricket) एका चालू वर्षात सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. या रेकॉर्डच्या बाबतील त्यानं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा रेकॉर्ड (Babar Azam Break Ricky Ponting Record) देखील मोडला आहे.

दरम्यान, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत कुमारा संगाकाराचा (Kumar Sangakara) हात कोणीही धरू शकलं नाही. संगाने 2014 साली एका वर्षात एकूण 2868 धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आहे. रिकीने 2005 मध्ये एका वर्षात एकूण 2868 धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा किंग कोहली (Virat Kohli) विराजमान आहे. कोहलीच्या नावावर एका वर्षात 2818 धावा आहेत. त्यानंतर आता बाबर लाईनमध्ये लागला आहे.