हेच बाकी होतं! Babar Azam आऊट होताच बॉलरने 'शूजवरून केला फोन', व्हिडीओ

बाबर आझमला आऊट करताच बॉलरनं शूट कानाला का लावला? मैदानात नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

Updated: Apr 24, 2021, 10:19 AM IST
हेच बाकी होतं! Babar Azam आऊट होताच बॉलरने 'शूजवरून केला फोन', व्हिडीओ title=

मुंबई: फलंदाज आऊट झाला की बॉलर किंवा विरुद्ध संघातील खेळाडू आनंद साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या अॅक्शन किंवा मैदानात डान्स करत असल्याचे अनेक व्हिडीओ चर्चेत आले आहेत. पण आऊट केल्यानंतर चक्क बॉलरनं शूट काढून फोन लावल्याचा हा अजब प्रकार एका सामन्यात पाहायला मिळाला. 

झिम्बाब्वेनं पाकिस्तानला धूळ चारत इतिहास रचला आहे. झिम्बाब्वे संघाने 18 धावांनी पाकिस्तानचा पराभव केला. पहिल्यांदीच टी 20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानला पराभूत करण्यात त्यांना यश मिळाल्यानं त्याचा उत्साह आणि आनंदही जास्त होता. त्याच दरम्य़ान ग्राऊंडमधील एक सेलिब्रेशनचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. त्याच दरम्यान बाबर आझमला आऊट करताच बॉलरनं कानाला शूट लावला आणि त्याचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. 

बाबर आझमची विकेट घेतल्यानंतर झिम्बाब्वेचा गोलंदाज ल्यूक जोंवेने जबरदस्त आनंद साजरा केला. त्याने आपल्या पायातील शूट काढून हातात घेतला आणि थेट फोन केल्याची अॅक्शन करत कानाला लावला. चाहत्यांनी त्याच्या या फोटो आणि व्हिडीओवर खूप कमेंट्स केल्या आहेत.

सोशल मीडियावर या बॉलरची तुलना दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर तबरेज शमसीशीही केली जात आहे. ल्यूकने फेकलेल्या बॉलवर बाबर आझमने शॉट खेळला आणि वेस्ली माधेवेरेने तो कॅच पकडल्यानं बाबर आऊट झाला. बाबर आऊट झाल्याचं सेलिब्रेशन टीमने मैदानात केलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

झिम्बाब्वेने दुसर्‍या टी-20 सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचा 18 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यातील विजय झिम्बाब्वेसाठी विशेष होता कारण टी-20 क्रिकेटमध्ये या संघाने प्रथमच पाकिस्तानला पराभूत केले. झिम्बाब्वेपेक्षाही पाकिस्तानचा संघ मजबूत आहे, पण या सामन्यात यजमान संघाने पाहुण्या संघाला पराभवाचा धक्का दिला.