भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला झटका

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात झालीये. मात्र या स्पर्धेतील हायवोल्टेज मुकाबला रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. 

Updated: Jun 1, 2017, 04:12 PM IST
भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला झटका title=

लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात झालीये. मात्र या स्पर्धेतील हायवोल्टेज मुकाबला रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. 

या सामन्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा झटका बसलाय. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज रियाझ फिट नसल्याने तो या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जातेय. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

३१ वर्षीय वेगवान गोलंदाज रियाझला डाव्या गुडघ्याला दुखापत झालीये. त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे पीसीबीने म्हटलंय. पाकिस्तानची क्रिकेट टीम सध्या बर्मिंगहॅममध्ये असून संघाचा सराव सुरु आहे.