Zim vs Pak: एक चूक महागात पडली! फलंदाज उभ्या-उभ्या झाला आऊट, व्हिडीओ

एका छोट्या चुकीमुळे नौमनचं पहिलं कसोटी शतक देखील थोडक्यासाठी चुकलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Updated: May 11, 2021, 12:24 PM IST
Zim vs Pak: एक चूक महागात पडली! फलंदाज उभ्या-उभ्या झाला आऊट, व्हिडीओ

हरारे: काही वेळा गुगली बॉलने फलंदाज आऊट झाल्याचे किंवा रनआऊटचे जबरदस्त व्हिडीओ आपण पाहिले असतील. मात्र पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. फलंदाजाला त्याची एक चूक महागात पडली आणि तो एका क्षणात आऊट झाला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हरारे कसोटी सामन्यात फलंदाजाच्या छोट्या चुकीमुळे तो आऊट झाला. पाकिस्तानचा फलंदाज नौमन अली क्रीजच्या आत उभ्या-उभ्या स्टम्प आऊट झाला आहे. एवढेच नव्हे तर या चुकीमुळे नौमनचं पहिलं कसोटी शतक देखील थोडक्यासाठी चुकलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

नेमकं काय घडलं?
 नौमान अली 97 धावांवर आऊट झाला त्यामुळे त्याचं शतक पूर्ण होऊ शकलं नाही. कसोटी शतकापासून केवल 3 धावा दूर असताना त्याच्या एका चुकीमुळे हे शतक हुकलं. झिम्बाब्वेचा स्पिनर स्पिनर टेंडाई चिसोरोने टाकलेला बॉल टोलवताच विकटकीपरने बॉल कॅच पकडला आणि आऊट केलं.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आपण आऊट झालो याचा 2 मिनिटं फलंदाजालाही विश्वास बसत नव्हता. पाकिस्तान संघाने 147 धावांनी झिम्बाब्बेवर विजय मिळवला. टेस्ट सीरिजमध्य़े 2-0 ने आघाडी मिळवली आहे.