PAK vs CAN T20 WC: पाकिस्तानचं नशिबच फुटकं! गाशा गुंडाळण्याची वेळ; पावसाने खोडा घातला तर काय होणार?

Pakistan vs Canada Weather Report: टीम इंडियाकडून आणि युएसएकडून पराभव स्विकारल्यानंतर आता पाकिस्तान (Pakistan Qualification Scenario) सुपर 8 मधून पडणार की काय? असा सवाल विचारला जाऊ लागलाय. अशातच कॅनडाविरुद्धच्या सामन्यावर सर्वांचं लक्ष आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jun 11, 2024, 07:07 PM IST
PAK vs CAN T20 WC: पाकिस्तानचं नशिबच फुटकं! गाशा गुंडाळण्याची वेळ; पावसाने खोडा घातला तर काय होणार? title=
Pakistan will Eliminate if rain stop pakistan vs canada match

PAK vs CAN Pitch Report And Weather Forecast : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) मोठे उलटफेर झाल्याचं पहायला मिळत आहे. ग्रुप ए मध्ये युएसने पाकिस्तानचा पराभव केला होता तर टीम इंडियाने देखील पाकिस्तानला पाणी पाजलंय. भारताने केलेल्या पराभवानंतर आता पाकिस्तान संघावर क्रिडाविश्वातून टीका होताना दिसतेय. अशातच आता पाकिस्तान संघाला (Pakistan Cricket) लाज राखण्यासाठी आता कॅनडाविरुद्ध विजय (Pakistan vs Canada) मिळवणं आवश्यक असेल. अशातच आजच्या सामन्यात पावसाचं सावट आहे. जर पावसाने सामन्यात खोडा घातला तर पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागणार आहे.

पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. याच मैदानावर पाकिस्तानला युएसए आणि टीम इंडियाकडून पराभव स्विकारावा लागला होता. अशातच आता आजच्या सामन्यात देखील पाकिस्तानची कमान गोलंदाजांवर असणार आहे. तर आजच्या सामन्यात पावसाचे ढग असणार आहेत. ढगाळ वातावरण असल्याने हा सामना पावसामुळे वाहून जाऊ नये, अशी पाकिस्तानची इच्छा आहे. त्यामुळे सामना पावसामुळे फिसकटला तर पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. 

पाकिस्तान सुपर 8 मध्ये जाणार?

पाकिस्तानने दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खात्यात एकही गुण नाही. पाकिस्तानला भोपळा देखील फोडता आलेला नाहीये. तर पाकिस्तानचा नेट रननेट सध्या -0.150 आहे. त्यामुळे पाकिस्तानला काहीही करून आगामी दोन सामने मोठ्या मार्जिनने जिंकावे लागतील. 

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सॅम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान शाह माझे.

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी कॅनडाचा संघ - साद बिन जफर (कर्णधार), आरोन जॉन्सन, रविंदरपाल सिंग, नवनीत धालीवाल, कलीम साना, डिलन हेलिगर, जेरेमी गॉर्डन, निखिल दत्ता, परगट सिंग, निकोलस किर्टन, रियान खान पठाण, जुनैद सिद्दीकी, दिलप्रीत बाजवा, श्रेयस मोवा, रियास मोवा जोशी.