कार्डिफ : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने इंग्लंडला हरवत फायनलमध्ये प्रवेश केलाय. पाकिस्तानने इंग्लंडचा ८ विकेट राखून पराभव केलाय.
पाकिस्तानने टॉस जिंकताना इंग्लंडला पहिल्यांदा फलंदाजीसाठी बोलावले होते. मात्र पाकिस्तानच्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा अख्खा डाव २११ धावांवर आटोपला. ज्यो रुट(४६), जॉनी बेअस्ट्रॉ(४३), बेन स्टोक्स(३४) यांच्याशिवाय इतर फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही.
इंग्लंडचे हे २१२ धावांचे सोपे आव्हान पाकिस्तानने दोन विकेट गमावताना पूर्ण केले. पाकिस्तानचा सलामीवीर अझर अलीने ७६ धावा केल्या. तर फखार झमनने ५७ धावा करताना विजयाचा पाया रचला. त्यावर बाबर आझम(नाबाद ३८) आणि मोहम्मद हाफीझ(नाबाद २२) यांनी विजयाचा कळस चढवला.