बुमराहची हुबेहुब नक्कल करतोय हा पाकिस्तानी मुलगा

हा व्हिडिओ उमर आफ्रीदी नावाच्या इसमाने ट्विट केलाय.

Updated: Oct 23, 2018, 01:24 PM IST
बुमराहची हुबेहुब नक्कल करतोय हा पाकिस्तानी मुलगा  title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहची लोकप्रियता बॉर्डरच्या पलीकडे पाकिस्तानपर्यंत पोहोचली आहे. याचा एक पुरावाच थेट समोर आलायं. यामध्ये 5 वर्षाचा पाकिस्तानी मुलगा बुमराहच्या बॉलिंगची कॉपी करताना दिसतोय. बुमराहची अॅक्शन करतानाचा हा व्हिडिओ उमर आफ्रीदी नावाच्या इसमाने ट्विट केलाय.

बुमराहची कॉपी 

 हे ट्विट त्याने विरेंद्र सेहवाग आणि जसप्रीत बुमराह यांना टॅग केलंय. 'नुकत्याच संपलेल्या आशिया कप स्पर्धेनंतर हा मुलगा तुमचा मोठा फॅन झालायं', असं त्याने लिहिलं.

'प्रत्येकवेळी तो तुमच्याप्रमाणे बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय' असेही त्याने म्हटले. 

जसप्रीतला आनंद 

आशिया कपमध्ये 4 मॅचमध्ये 8 विकेट घेणाऱ्या जसप्रीतनेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलीयं. 

'मी लहान असतानाही वेगवेगळ्या क्रिकेटर्सची अॅक्शन फॉलो करायचो, आता कोणी लहान माझी अॅक्शन कॉपी करताना पाहून खूप आनंद होतोय', असे बुमराहने म्हटलंय.