'पाकिस्तानची संपूर्ण टीम घ्या आणि बदल्यात विराट कोहली द्या'

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं सगळ्या जगभर प्रसिद्धी मिळवलीय. विराटची ही क्रेझ शेजारच्या पाकिस्तानातही चांगलीच पसरलीय. याचा अनुभव नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलाय. 

Updated: Jun 7, 2017, 06:17 PM IST
'पाकिस्तानची संपूर्ण टीम घ्या आणि बदल्यात विराट कोहली द्या' title=

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं सगळ्या जगभर प्रसिद्धी मिळवलीय. विराटची ही क्रेझ शेजारच्या पाकिस्तानातही चांगलीच पसरलीय. याचा अनुभव नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलाय. 

४ जून रोजी एका पाकिस्तानी पत्रकार नजराना गफ्फार यांनी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांना म्हटलंय की 'भारतानं आमची संपूर्ण टीम घ्यावी आणि एका वर्षासाठी आम्हाला कोहली द्यावा'... या ट्विटवरून कोहलीचा भाव पाकिस्तानातही वधारल्याचंच दिसतंय. 

पण, गफ्फार यांची ही सौदेबाजी मात्र भारतीयांच्या पचनी पडली नाही. त्यांनी ट्विटरवरच गफ्फार यांना चांगलंच ट्रोल केलं... 

नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये विराटनं नाबाद ८१ रन्सची खेळी खेळून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता.