धोनी, विराट नव्हे तर हा आहे टीम इंडियाचा बाहुबली

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजयी सलामी देताना धमाकेदार सुरुवात केलीये. भारतीय संघाचा दुसरा सामना श्रीलंकेशी होणार आहे. ८ जूनला हा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारत उपांत्यफेरीत प्रवेश करेल.

Updated: Jun 7, 2017, 02:21 PM IST
धोनी, विराट नव्हे तर हा आहे टीम इंडियाचा बाहुबली title=

मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजयी सलामी देताना धमाकेदार सुरुवात केलीये. भारतीय संघाचा दुसरा सामना श्रीलंकेशी होणार आहे. ८ जूनला हा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारत उपांत्यफेरीत प्रवेश करेल.

पहिल्या सामन्यात दमदार ९१ धावांची खेळी साकारणाऱ्या रोहित शर्माने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात त्याने लहानग्या स्टारला टीम इंडियाचा बाहुबली म्हटलंय.

रोहितने या व्हिडीओमध्ये शिखर धवनचा मुलगा जोरावरला टीम इंडियाचा बाहुबली म्हटलंय. जेव्हा तुम्ही टीम इंडियाच्या बाहुबलीसोबत असता तेव्हा नेहमीच मजा येते, असं रोहित म्हणालाय. 

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on