'चॅम्पियन असशील घरात!' पाकमध्ये स्नूकर चॅम्पियनला स्नूकर खेळतो म्हणून अटक

Pakistani snooker champion detained by Police: पाकिस्तानमध्ये एका स्नुकर चॅम्पियन (Ahsan Ramzan) खेळाडूला स्नूकर खेळतो म्हणून अटक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Updated: Aug 4, 2023, 06:28 PM IST
'चॅम्पियन असशील घरात!' पाकमध्ये स्नूकर चॅम्पियनला स्नूकर खेळतो म्हणून अटक title=
Pakistani snooker champion Ahsan Ramzan

Snooker Champion Ahsan Ramzan: पाकिस्तानमध्ये कधी काय होईल सांगता येणार नाही. ज्या देशात लोकशाहीची खुलेआम गळचेपी होत असेल, तर त्या देशाकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा ठेवणं देखील कढीण जातं. याचीच प्रचिती देणारी एक घटना नुकतीच पाकिस्तानमध्ये (Pakistan) घडली आहे. पाकिस्तानमध्ये एका स्नुकर चॅम्पियन (Snooker Champion) खेळाडूला स्नूकर खेळतो म्हणून अटक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आगामी स्पर्धांसाठी तयारी करत असलेल्या खेळाडूंला पोलिसांनी अटक केल्याने पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

पाकिस्तानी वेबसाईट डॉनच्या वृत्तानुसार, जागतिक आणि आशियाई अंडर-21 स्नूकर चॅम्पियन अहसान रमजान (Ahsan Ramzan) याला पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलं. बुधवारी रात्री उशिरा अहसान रमजान नेहमीप्रमाणे प्रॅक्टिस करत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेलं. प्रकरण एवढं तापलं की या प्रकरणात थेट पंतप्रधानांना हस्तक्षेप करावा लागला. अहसानने पाकिस्तानचे (Pakistan PM) पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पंजाबचे पोलीस महानिरीक्षक उस्मान अन्वर यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.

अहसानने व्हिडीओ (Viral Video) शेअर करत बुधवारी रात्री नेमकं काय झालं, याची आपबिती सांगितली. पंजाब पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा स्नूकर अकादमीवर छापा टाकला आणि मला ताब्यात घेतलं. रात्री उशिरा स्नूकर क्लब सुरु ठेवल्याबद्दल छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी मी पोलिसांना माझी ओळख सांगितली आणि क्लब बंद करण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिसांनी मला ताब्यात घेतलं. माझा मोबाईल आणि इतर साहित्य देखील काढून घेतलं. माझे मित्र जेव्हा पोलीस ठाणयात पोहोचले तेव्हा कुठे माझी सुटका झाली, असं अहसान म्हणतो.

पाहा Video

अहसानला अश्रू अनावर...

मी नेहमी स्नूकर खेळताना माझ्या देशाचं नाव कसं उंचावले, याचा विचार केला. देशाचं नाव उंचावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनेकदा मी यशस्वी देखील झालोय. पण मला माझ्याच देशात अशाप्रकारने अपमानित व्हावं लागलतंय, असं म्हण असताना अहसानचे अश्रू अनावर झाले. त्यावेळी त्याने बोथट मत देखील व्यक्त केलं. मला वाटतं की या देशात स्नूकर हा एकमेव खेळ आहे, ज्याला अनाथासारखं वागवलं जातं, असं म्हणत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.