close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'दंगल' गर्ल गीता फोगाटच्या पतीचा रुममधील डान्स सोशल मीडियावर व्हायरल

दिल्लीत नांगल ठाकरान भागात राहणारा पवन कुमार सरोहा याच्यासोबत कुस्तीपट्टू गीता फोगाट हिचे २०१६ मध्ये लग्न झाले आहे.

Updated: Jul 27, 2018, 05:19 PM IST
'दंगल' गर्ल गीता फोगाटच्या पतीचा रुममधील डान्स सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : 'दंगल गर्ल' गीता फोगाट हिचा पती पवन कुमार सरोहा याचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पवन एका खोलीत हरियाण्वी गाणे गाताना दिसत आहे. 'बोले तेरे मीठे-मीठे, बात तेरी साच्चा लागे...' या गाण्यावर भन्नाट नाचत आहे. पेहलवान पवन याचा डान्स व्हिडिओ पत्नी गीता फोगाट हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलाय.

रेसलर गीता फोगट की शादी: वेडिंग में शामिल हुए आमिर खान, साक्षी मलिक

गीता फोगाट सोशल मीडियावर सातत्याने अॅक्टीव्ह दिसत आहे. तिने पती पवनच्या आधीच हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओला चांगल्या लाईक्स् मिळत आहेत. गीताने आपल्या पतीचा हा डान्स मोबाईलमध्ये कैद केला आणि इंस्टावर पोस्ट केला. पवनच्या या व्हिडिओला अनेक लोकांची पसंती मिळत आहे. दोन दिवसात २ लाख लाईक मिळाल्या आहेत.

 

#dancelove @pawankumar_saroha86 

A post shared by Geeta PawanSaroha (@geetaphogat) on