मुंबई : टीम इंडिया खेळाडूंची लोकप्रियता बॉलिवूड कलाकारांपेक्षा कमी नाही, यात शंका नाही. हे खेळाडू आपले जीवन राजेशाही थाटात जगत आहेत. विराट कोहली असो किंवा एमएस धोनी सर्वच मोठ्या आणि आलिशान घरांचे मालक आहेत. चला भारतीय संघाच्या काही खेळाडूंची खास घरे पाहुया.
सचिन तेंडुलकर यांचे घर वांद्रे पश्चिमेच्या पेरी क्रॉस रोडवर आहे. ज्याला मुंबईती अती सुंदर परिसर मानला जातो. सचिन आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत आपल्या आलिशान बंगल्यात राहतो. सचिनने 2007 मध्ये हा बंगला 39 कोटी रुपयांना खरेदी केला होता. 6000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या सचिन तेंडुलकरचा बंगला आता जवळपास 100 कोटी रुपांच्या घरात आहे.
विराट कोहलीकडे मुंबईत एक अल्ट्रा-आधुनिक अपार्टमेंट आहे. ज्यामध्ये चार सुसज्ज बेडरूम आणि एक मोठा हॉल आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे घर 34 कोटी रुपये असून ते मुंबईतील वरळी येथे आहेत. लग्नानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 2017 मध्ये त्यांच्या घरी शिफ्ट झाले.
महेंद्रसिंह धोनी याचे रांचीमध्ये एक फार्म हाऊस आहे. हे फार्म हाऊस 7 एकरात पसरलेले आहे. धोनीच्या या फार्म हाऊसची किंमत कोटींमध्ये आहे. धोनीच्या या फार्म हाऊसमध्ये पेट (श्वान) आणि घोडेही आहेत. धोनीचे प्राण्यांवर खूप प्रेम आहे.
रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह आपल्या मुलीसह मुंबईत राहतात आणि त्यांच्या अपार्टमेंटची किंमत 30 कोटी आहे. 2015 मध्ये रितिकाशी लग्न झाल्यानंतर रोहित शर्मा यांनी ही आलिशान मालमत्ता खरेदी केली. हे अपार्टमेंट 6,000 चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेले आहे आणि अरबी समुद्राचे नेत्रदीपक दृश्य या महालातून पाहायला मिळते.
युवराज सिंग आणि त्यांची पत्नी हेजल कीच एका अपार्टमेंटमध्ये राहतात ज्याची किंमत 64 कोटी रुपये आहे. 16,000 चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेला हा आलिशान फ्लॅट 29व्या मजल्यावर आहे आणि रोहितच्या घराप्रमाणेच या महालातून अरबी समुद्राचे भव्य दर्शन पाहायला मिळते.