IPL 2021: Video, एबी डिविलियर्सचं मोठं स्पष्टीकरण, मॅच दरम्यान या गोष्टीसाठी मॅक्सवेल माझ्यावर चिडला

डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेलने शानदार अर्धशतक ठोकत आरसीबीला मोठ्या धावसंख्येवर पोहोचवले. या सामन्या दरम्यानचा मोठा खुलासा डिव्हिलियर्सने मॅक्सवेलविषयी केला आहे.

Updated: Apr 19, 2021, 09:25 PM IST
IPL 2021: Video, एबी डिविलियर्सचं मोठं स्पष्टीकरण, मॅच दरम्यान या गोष्टीसाठी मॅक्सवेल माझ्यावर चिडला

मुंबई : आयपीएल 2021 च्या 10 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ने कोलकाता नाइट रासडर्सना 38 धावांनी पराभूत केले. एबी डिविलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघेही या सामन्याचे स्टार होते. एबी डिविलियर्स आणि ग्लेन र्मॅलेक्सवेलने शानदार अर्धशतक ठोकत आरसीबीला मोठ्या धावसंख्येवर पोहोचवले. या सामन्या दरम्यानचा मोठा खुलासा एबी डिविलियर्स मॅक्सवेलविषयी केला आहे.

डिव्हिलियर्सवर मॅक्सवेल चिडला

कोलकाता नाइट रासडर्सविरुद्ध मॅक्सवेलबरोबर सामन्यात भागीदारी करणारा एबी डिविलियर्स म्हणाला की, थकलेल्या मॅक्सवेलला त्याच्यावर राग आला होता. सामन्यानंतर युजवेंद्र चहलशी बोलताना तो म्हणाले की, "जेव्हा मी मैदानावर आलो तेव्हा मला समजले की, ग्लेन मॅक्सवेल खूप थकला आहे. त्याने मला सांगितले की, मला आणखी धावण्याची इच्छा नाही. खरेतर मी मैदानावर येताच दोन आणि तीन धावा काढण्यास सुरुवात केली. म्हणून तो माझ्यावर खूप चिडला."

मॅक्सवेल आणि डिविलियर्सकडून केकेआरची धुलाई

केकेआरच्या विरोधात मॅक्सवेल आणि एबी डिविलियर्स यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. या सामन्यात मॅक्सवेलने 49 चेंडूंत 78 धावांची शानदार खेळी खेळली. त्या डावात डिविलियर्सने 9 चौके आणि 3 सिक्स मारले. खेळाच्या शेवटी डिविलियर्सने केवळ 34 चेंडूत नाबाद 76 धावा ठोकल्या. डिविलियर्सने आपल्या खेळीत 9 चौके आणि 3 सिक्स ठोकले. या दोन खेळाडूंमुळे आरसीबीची धावसंख्या 200 च्या पार गेली.

मॅक्सवेलबरोबर खेळण्याचा आनंद

चहल सोबत बोलताना डिविलियर्सने सांगितले की, ग्लेन मॅक्सवेलबरोबर फलंदाजी कराना मला फार मज्जा आली. तो म्हणाला, "आम्ही एकमेकांसोबत खेळण्याचा आनंद घेत होतो. आम्ही दोघे सारखेच खेळाडू आहोत. आम्हाला संघासाठी खेळायला आणि आपला खेळ दाखवायला आवडते. जेव्हा मी फलंदाजीला करायला आलो, तेव्हा आमच्यात इतकेच बोलणे झाले की, आपल्याला इथून चांगली भागीदारी करायला हवी."