अखिलाडू वृत्तीमुळे पोलार्डवर चौफेर टीकास्त्र

कॅरेबियन प्रिमिअर लीगमधल्या मॅचमध्ये अखिलाडू वृत्ती दाखवल्यामुळे कायरन पोलार्डवर चौफेर टीका होत आहे.

Updated: Sep 4, 2017, 09:49 PM IST
अखिलाडू वृत्तीमुळे पोलार्डवर चौफेर टीकास्त्र title=

मुंबई : कॅरेबियन प्रिमिअर लीगमधल्या मॅचमध्ये अखिलाडू वृत्ती दाखवल्यामुळे कायरन पोलार्डवर चौफेर टीका होत आहे. एव्हिन लुईसला शतकापासून रोखण्यासाठी पोलार्डनं मुद्दामहून नो बॉल टाकला.

बार्बाडोस ट्रायडंट्सचा कॅप्टन असलेल्या पोलार्डनं सेंट किट्स पॅट्रियट्सविरुद्धच्या मॅचच्या शेवटच्या ओव्हरमधला शेवटचा बॉल नो बॉल टाकला. या मॅचमध्ये बार्बाडोसचा पराभव झाला असला तरी पोलार्डच्या वर्तनाचा मात्र सोशल नेटवर्किंगवर समाचार घेतला जातोय.

१२९ रन्सचा पाठलाग करताना सेंट किट्सनं एव्हिन लुईसच्या नाबाद ९७ रन्सच्या मदतीनं बार्बाडोसचा तब्बल १० विकेट्सनं पराभव केला. लुईस ३२ बॉल्समध्ये ९७ रन्सवर खेळत असताना सेंट किट्सला विजयासाठी एका रनची आवश्यकता होती. त्यावेळी पोलार्डनं जाणूनबुजून नो बॉल टाकला आणि लुईसला शतक करण्यापासून रोखलं.