मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून महेला जयवर्धने यांची होणार हकालपट्टी?

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 मध्ये त्यांच्या चाहत्यांची खूप निराशा केली आहे. 

Updated: May 4, 2022, 09:02 AM IST
मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून महेला जयवर्धने यांची होणार हकालपट्टी? title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगची सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स मानली जाते. आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला यंदाच्या सिझनमध्ये मात्र केवळ एकच विजय नोंदवता आला आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 मध्ये त्यांच्या चाहत्यांची खूप निराशा केली आहे. 

सध्याच्या सिझनमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम तळाला आहे. IPL 2022 मध्ये मुंबईने पहिले 8 सामने गमावले आहेत. 9वा सामना जिंकल्यानंतर मुंबईला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याची कोणतीही संधी नाहीये. दरम्यान याचा ठपका खेळाडूंबरोबरच कोचिंग स्टाफच्याही माथी मारला जातोय. कदाचित याचा परिणाम पुढच्या सिझनमध्ये पहायला मिळू शकतो. 

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने हे सध्या टार्गेटवर असल्याचं म्हटलं जातंय. महेला जयवर्धने मुख्य प्रशिक्षक बनताच टीमने 2017 मध्ये विजेतेपद पटकावलं. यानंतर, 2018 मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमला प्लेऑफमध्ये जागा मिळवता आली नाही. मात्र पुढच्या दोन्ही सिझनमध्ये म्हणजे 2019 आणि 2020 मध्ये सलग जेतेपदं पटकावून टीमने चांगलं कमबॅक केलं.

मात्र सध्याच्या सिझनची मुंबईची कामगिरी फारच वाईट दिसून आली. IPL 2022 चा मुंबईचा परफॉरमन्स पाहता, फ्रेंचायझी पुढच्या वर्षी मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांना बदलण्याचा विचार करू शकते. त्यामुळे आयापीएलच्या आगामी सिझनमध्ये मुंबईच्या टीममध्ये प्रशिक्षकपदासाठी मोठे बदल होण्याची शक्यता आहे.