T20 World Cup 2022: Powell चा Power सिक्स अन् थोडक्यात बचावली तरूणी, पाहा Video

वेस्ट इंडिजसाठी (West Indies vs Zimbabwe)  'करो किंवा मरो'चा सामना... अन् Rovman Powel ने खेचला सिक्स..

Updated: Oct 19, 2022, 05:12 PM IST
T20 World Cup 2022: Powell चा Power सिक्स अन् थोडक्यात बचावली तरूणी, पाहा Video title=
Powells Power Six and the girl survived T20 World Cup watch video

Rovman Powell : टी 20 वर्ल्ड कपला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. T20 World Cup 2022 चा 8 वा सामना वेस्ट इंडिज आणि झिंबाब्वे यांच्यात (West Indies vs Zimbabwe) खेळला जात गेला. वेस्ट इंडिजसाठी हा 'करो किंवा मरो'चा सामना होता. वेस्ट इंडिजचा पहिल्या सामन्यात पराभव झाला होता. त्यानंतर आज सुरू असलेला सामनात वेस्ट इंडिजचा पराभव झाल्यास, संघाला गाशा गुंडाळावा लागणार लागला असता. मात्र, नुकत्याच आलेल्या माहितीनुसार वेस्ट इंडिजने झिंबाब्वेचा 31 धावांनी पराभव (West Indies defeated Zimbabwe by 31 runs) केला आहे.

वेस्ट इंडिजची (West Indies) फलंदाजी संघासाठी टेन्शनचा विषय आहे. दिग्गज खेळाडू असून देखील फलंदाजांना कमाल दाखवता आली नाही. असं असलं तरी वेस्ट इंडिजचा रॉवमन पॉवेल (Rovman Powell) सध्या चर्चेत आहे. त्याला कारण ठरलं, त्याचा फ्लॅट सिक्स...

आणखी वाचा - T20 World Cup: Live सामना सुरु असताना लहान बाळासोबत मोठी दुर्घटना

नेमकं काय झालं?

झिंबाब्वेचा गोलंदाज मुझराबानी शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आला. 19 ओव्हरपर्यंत वेस्ट इंडिजच्या 137 धावा झाल्या होत्या. अखेरच्या षटकात जास्तीत जास्त धावा काढण्यासाठी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी कंबर कसली. वेस्ट इंडिजचे अकेल होसीन आणि रॉवमन पॉवेल हे दोघ घातक फलंदाज मैदानात होते. त्यावेळी पॉवेलने मुझराबानी जोरदार षटकार खेचला.

पाहा व्हिडीओ- 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

पॉवेलने मुझराबानीच्या (Blessing Muzarabani) पहिल्या बॉलवर आडवी पट्टी म्हणजे फ्लॅट सिक्स (Powell smashes Six) खेचला. बॉलने थेट बॉन्ड्री पार केली आणि प्रेक्षकांच्या ग्राऊंडवर पोहचला. त्यावेळी त्याठिकाणी बसलेली एक मुलगी बॉल लागता लागता थोडक्यात बचावल्याचं पहायला मिळालं.