टीम हरल्यावर प्रीती झिंटा वीरेंद्र सेहवागवर भडकली

भडकल्याचे हे फोटो व्हायरल 

टीम हरल्यावर प्रीती झिंटा वीरेंद्र सेहवागवर भडकली title=

मुंबई : आयपीएल सीझन 11 मध्ये रविवारी इंदौरमध्ये पंजाबने हरवलं होतं. मात्र त्याच्या दोन दिवसानंतर मंगळवारी राजस्थानला त्याच्या घरी जयपुरमध्ये मात्र हरवू शकली नाही. आणि अगदी रोमांचक सामन्यात पंजाब हा संघ 15 धावांनी हरला. मानसिंह स्टेडिअममध्ये राजस्थानची पंजाब विरूद्ध आयपीएलमध्ये 5 वेळा विजय मिळवला होता. पंजाबच्या या अपयशामुळे मालकिण प्रिटी झिंटा भरपूर नाराज झाली. आणि तिची हा राग सेहवागसोबत बोलताना समोर दिसला. 

Preity annoyed with sehwag

सामन्यानंतर जेव्हा प्रिती सेहवागसोबत बोलत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील हा राग स्पष्ट दिसत होता. त्यावेळी सेहवाग प्रीति सांगत असलेल्या सगळ्या गोष्टी फार गंभीरपणे ऐकत होता. सेहवाग आणि प्रीतिचे हे दृष्य पहिल्यांदा समोर आले नाहीत. या अगोदर ही लो स्कोरिंग मॅचमध्ये हैदराबादच्या विरूद्ध पंजाबने फक्त 133 धावांचा पाठलाग करू शकले नाहीत. 

Preity disappointed

पंजाबचा पराभव जस जसा जवळ येत होता तस तसा प्रितीच्या चेहऱ्यावरील रंग उडत होता. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त राहुल एकटा संघर्ष करत होता तेव्हा प्रिती त्याच्या चांगल्या शॉर्टवर टाळ्या वाजवून प्रोत्साहन करत आहे. मात्र बाकीच्या वेळी प्रिती झिंटा अगदी नाराज होऊन बसली होती. 

Preity meets opponents happily

आयपीएल २०१८मध्ये दोन वर्षाच्या बंदीनंतर परतलेल्या राजस्थानने मंगळावारी घरच्या मैदानावर पंजाबला १५ धावांनी हरवले. या विजयासोबत राजस्थानने प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्यात. या सामन्यात पंजाबकडून लोकेश राहुल आणि अँड्र्यू टायने दमदार कामगिरी केली. मात्र संघाला पराभवापासून वाचवू शकले नाही. राहुलने ९५ धावांची खेळी केली. या सामन्यात अजिंक्य रहाणेने शानदार कॅच घेतला. हा कॅच इतका जबरदस्त होता की सगळेजण रहाणेची स्तुती करु लागले. मात्र प्रीती झिंटा हैराण झालेली दिसत होती. 

preity happy with KL Rahul innings