चेन्नई : चेन्नईने २० ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून १६० रन केल्या आहेत. त्यामुळे पंजाबसमोर विजयासाठी १६१ रनचे आव्हान असणार आहे. चेन्नईकडून फॅफ ड्यू प्लेसिसने सर्वाधिक ५४ रनची खेळी केली. तसेच महेंद्र सिंह धोनीने नॉटआऊट ३७ तर शेन वॉटसनने २६ रन केल्या.
WATCH: @faf1307's attacking 54 (38)
https://t.co/yRNJMppTol #VIVOIPL pic.twitter.com/nB9Weftts3
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2019
चेन्नईने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या ओपनरनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय सार्थ ठरवला. शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस या दोघांनी चेन्नईला चांगली सुरुवात दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ५६ रन जोडले. चेन्नईला पहिला झटका शेन वॉटसनच्या रुपात लागला. वॉ़टसन २६ रनवर कॅचआऊट झाला.
Innings Break!
A well made 54 from @faf1307 and some late onslaught from @msdhoni help @ChennaiIPL post a total of 160/3. Will they defend it here in Chennai?
Stay tuned https://t.co/Dyq8Gkq4gZ #KXIPvCSK pic.twitter.com/imBYYhxmv8
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2019
वॉटसन आऊट झाल्यानंतर सुरेश रैनाला वरच्या क्रमांकावर पाठवण्यात आले. रैना-प्लेसिस या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४४ रन जोडले. चेन्नईचा स्कोअर १०० असताना फॅफ ड्यू प्लेसिस कॅचआऊट झाला. त्याला आश्विनने आऊट केले. प्लेसिसने ५४ रन केल्या. यानंतर कॅप्टन धोनी मैदानात आला. पुढील बॉ़लवर रैनाने देखील मैदानाबाहेरचा रस्ता धरला. आश्विनने त्याला बोल्ड केले. रैनाने १७ रन केल्या. यानंतर धोनीला साथ देण्यासाठी मैदानात अंबाती रायु़डू दाखल झाला. धोनी-रायुडू या जोडीने चौथ्या विकेटसाठी नॉटआऊट ६० रनची भागीदारी केली.
धोनीने २३ बॉलमध्ये ३७ रनची नाबाद खेळी केली. यामध्ये ४ फोर आणि १ सिक्सचा समावेश आहे. रायुडूने देखील नॉटआऊट २१ रन केल्या. पंजाबकडून सर्वाधिक ३ विकेट आश्विनने घेतल्या. तर इतर कोणत्याही बॉलरला विकेट घेण्यास अपयश आले.