चायना ओपनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात

चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार पी.व्ही.सिंधूला पराभवाचा धक्का बसल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आलेय.

Updated: Nov 17, 2017, 08:15 PM IST
चायना ओपनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात title=

फुजोऊ : चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार पी.व्ही.सिंधूला पराभवाचा धक्का बसल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आलेय.

क्वार्टरफायनलमध्ये सिंधूचा चीनच्या गाओ फांगजेईकडून पराभव झाला. गाओने सिंधूला २१-११, २१-१० असे दोन गेममध्ये सहज नमवले. सिंधूआधी सायना नेहवाल आणि साई प्रणीत यांचे कालच आव्हान संपुष्टात आले होते. 

दोनही गेममध्ये गाओच्या खेळासमोर सिंधू निष्प्रभ झाली. पहिला गेम २१-११ असा गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सिंधू पुनरागमन करेल असे वाटले होते. मात्र दुसऱ्या गेममध्येही गाओ वरचढ ठरली. 

हैदराबादची २२ वर्षीय खेळाडू गेल्या तीन आठवड्यांपासून सलग खेळतेय. तिने डेन्मार्क ओपन, फ्रेंच ओपननंतर नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला होता.