बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू झाली उपजिल्हाधिकारी

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने बुधवारी उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारलीत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 10, 2017, 10:50 AM IST
बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू झाली उपजिल्हाधिकारी   title=

हैदराबाद : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने बुधवारी उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारलीत.

सिंधू आंध्र प्रदेशच्या गोलापुडी जिल्ह्याची उपजिल्हाधिकारी म्हणून सूत्र हाता घेतली आहेत. पदभार स्वीकारला त्यावेळी सिंधूसोबत तिचे आईवडील उपस्थित होते.

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी २९ जुलैला सिंधूला नियुक्ती पत्र दिले होते. राज्य सरकारने ३० दिवसांच्या आत सिंधूला उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची अट घातली होती. 

ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेत्या सिंधूने सीसीएलए कार्यालयात जाऊन उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. सिंधूने जिल्हाधिकारी अनिल चंद्र पुनेथा यांच्यासमोर कागदपत्रांवर स्वाक्षरी करत पदभार स्वीकारला.