'रोहित शर्मामुळे तुला पद्मश्री मिळाला' म्हणणाऱ्या चाहत्याला आर अश्विनने दोन शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला नुकतचं पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 29, 2025, 01:39 PM IST
'रोहित शर्मामुळे तुला पद्मश्री मिळाला' म्हणणाऱ्या चाहत्याला आर अश्विनने दोन शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला... title=

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला नुकतचं पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळणारा तो तामिळनाडूमधील दुसरा क्रिकेटर ठरला आहे. दरम्यान एका चाहत्याने आर अश्विनला त्याला मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराचं श्रेय भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला देण्यास सांगितलं. यानंतर आर अश्विननेही त्याला उत्तर दिलं. एका चाहत्याने पद्मश्री मिळाल्यानंतर त्याचं अभिनंदन केलं असता आर अश्विनने त्याला उत्तर दिलो होतं. पण @Hitman450745 युजरनेम असणाऱ्या एका चाहत्याने आर अश्विनच्या 'धन्यवाद' कमेंटवर कमेंट करत परिस्थिती थोडीशी गंभीर केली. 

"जर आभार मानायचे असतील तर रोहित शर्माला म्हण, त्याने तुला खेळवलं आहे," असं हा चाहता म्हणाला. यानंतर आर अश्विनही त्यावर शांत बसला नाही आणि दोन शब्दांत त्याला उत्तर देत गप्प केलं. आर अश्विनने रिप्लायमध्ये "Dey paithiyam" म्हणजेच 'तू मूर्ख' असं म्हटलं. 

आर अश्विनने अचानक निवृत्तीची घोषणा केल्यापासून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. 2024-25 बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरु असतानाच आर अश्विनने निवृत्ती जाहीर केली होती.  पहिल्या तीन कसोटींपैकी फक्त एकाच सामन्यात आर अश्विनची निवड झाली. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या निर्णयानंतर, अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत. तथापि, अश्विनने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याच्या त्याच्या निर्णयावर खुलासा केला.

"मला या विश्रांतीची गरज होती. मी मालिका मध्येच सोडली. जरी मी सिडनी आणि मेलबर्न कसोटीनंतर एक्सवर काही गोष्टी पोस्ट केल्या असल्या मी क्रिकेटबद्दल जास्त बोललो नाही,. मी निवृत्तीबद्दल बोललो नाही कारण मी ड्रेसिंग रूममध्ये होतो आणि ड्रेसिंग रूमच्या पवित्र स्थानाचा आदर करणे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. आजकाल चाहत्यांमध्ये होणारं युद्ध खूप विषारी आहे," असं अश्विनने 'ऐश की बात' मध्ये म्हटले.

"तुम्हाला माहित असले पाहिजे की कधीकधी ते सहजतेने केले जाते. लोक बरंच काही बोलत आहेत, पण तसं काहीही नाही. त्यावेळी मला वाटलं की मी माझी सर्जनशीलता गमावली आहे. शेवट देखील आनंदी असू शकतो. जास्त अंदाज लावण्याचे कारण नाही," असं आर अश्विनने सांगितलं आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x