KKR चा खरा 'चॅम्पियन', आई रुग्णालयात असताना मैदानात उतरून जिंकवली आयपीएलची फायनल

Rahmanullah Gurbaz Mother : आई रुग्णालयात असताना मोठं मन राखून केकेआरचा (Kolkata Knight Riders) खेळाडू मैदानात आला अन् केकेआरला फायनल जिंकवून दिलीये.

सौरभ तळेकर | Updated: May 26, 2024, 11:38 PM IST
KKR चा खरा 'चॅम्पियन', आई रुग्णालयात असताना मैदानात उतरून जिंकवली आयपीएलची फायनल title=
Rahmanullah Gurbaz Mother Massage For IPL Final

Rahmanullah Gurbaz Mother Massage For IPL Final : कोलकाता नाईट रायडर्सने धमाकेदार अंदाजात आयपीएलची फायनल (IPL 2024 Final) जिंकली. केकेआरने हैदराबादचा 8 गडी राखून विजय मिळवला. आयपीएलच्या फायनलमध्ये आणि क्वालिफायर 1 मध्ये केकेआरचा हिरो ठरला रहमानउल्ला गुरबाज... मात्र, तुम्हाला माहितीये का? केकेआरसाठी चॅम्पियन ठरलेला रहमानउल्ला गुरबाज (Rahmanullah Gurbaz) खऱ्या अर्थाने हिरो ठरलाय. कोलकाताने यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरीचं प्रदर्शन केलं. मात्र, ऐन प्लेऑफच्या तोंडावर सलामीवीर फिल सॉल्टला मायदेशी जावं लागलं. त्यानंतर आई रुग्णालयात (Rahmanullah Gurbaz Mother) असताना देखील रहमानउल्ला गुरबाज भारतात आला अन् केकेआरला फायनल जिंकवून दिली. 

यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजने फायनलमध्ये केकेआरला विजयाच्या उंभरठ्यावर नेऊन ठेवलं. गुरबाजने 32 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या अन् एका बाजू लावून धरली होती. गुरबाजने रोखून धरवलेल्या विकेटमुळे हैदराबादच्या अडचणी वाढल्या अन् केकेआरने आरामात विजय मिळवला. गुरबाजने सामना संपल्यानंतर आईची आठवण काढली.

काय म्हणाला रहमानउल्ला गुरबाज ?

मी फायनलपूर्वी माझ्या आईशी बोललो आणि तिला काही हवं आहे का? असं विचारलं. तिनं उत्तर दिलं, 'बेटा, मला कशाचीही गरज नाही. तू फायनल जिंकणं ही माझ्यासाठी सर्वात मोठी भेट असेल. तुझा आनंद महत्त्वाचा आहे'. त्यामुळे हा विजय माझ्यासाठी महत्त्वाचा होता, असं रहमानउल्ला गुरबाज याने म्हटलंय.

दरम्यान, रहमानउल्ला गुरबाजने गेल्या आयपीएल हंगामात केकेआरकडून डेब्यू केला होता. गेल्या हंगामात त्याने 11 सामने खेळले अन् 227 धावा केल्या होत्या. तर हा हंगामात त्याने पहिलाच सामना हैदराबादविरुद्ध खेळला. केकेआर आणि हैदराबाद या सामन्यात स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क पुन्हा फॉर्मात आला असून त्याने आपल्या भेदक गोलंदाजीची झलक दाखवलीये. त्यामुळे आता केकेआरचे 24 कोटी फिटले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.