नवी दिल्ली : माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मते आगामी विश्व चषकाला लक्षात घेता आता भारताला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. यात महेंद्र सिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्या संघातील भूमिकेचाही समावेश आहे.
द्रविडला युवी आणि धोनीच्या भविष्याबाबत विचारले गेले असता, द्रविडने ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, निवड समिती आणि मंडळाने यावर विचार केला पाहिजे. पुढील दोन वर्षासाठी मंडळाच्या डोक्यात काय सुरू आहे, दोन्ही क्रिकेटर काय भूमिका निभावतील, संघात दोघांपैकी एकालाच संधी मिळेल का असे प्रति प्रश्न द्रविडने उपस्थित केले.
द्रविड म्हणाला, तुम्ही एका वर्षात किंवा पुढील सहा महिन्यासाठी या खेळाडूंचे आकलन करणार आहोत का, या दोघांवर निर्णय घेण्यापूर्वी इतर युवा प्रतिभांवर लक्ष्य केंद्रीत केले का असा प्रश्नही द्रविड याने उपस्थित केला. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सर्व दिग्गज खेळाडूंना स्थान देण्यात आले आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना स्थान मिळेल का अशी शंका उपस्थित केली.
धोनी आणि युवी सोबतच रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या स्पीन जोडीवरही विचार करायला हवा. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सपाट पिचवर दोन्ही प्रभावी ठरले नाही, असाही टोमणा द्रविडने मारला आहे.