All Rounder Cricketer Hits Back At All Eyes On Rafah Insta Post: सध्या सोशल मीडियावर इस्रायलविरुद्ध पॅलेस्टाइनदरम्यान सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर 'ऑल आइज ऑन राफा'ची तुफान चर्चा आहे. इन्स्टाग्रामवरील हे पॅम्पलेट प्रचंड व्हायरल झालं आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी हे पॅम्पलेट शेअर केलं आहे. या पॅम्पलेटवरुन सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. असं असतानाच आता गुजरात टायटन्सचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतियाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन एक खोचक प्रतिक्रिया नोंदवली आहे.
गाझा पट्टीतील राफा शहरातील निर्वासितांच्या छावणीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये 45 जणांचा मृत्यू झाला. 26 मे रोजी इस्रायलने केलेला हा हल्ला अंतरराष्ट्रीय न्यायालयाने या भागात हल्ले थांबवण्याचे निर्देश दिल्यानंतरही करण्यात आले. या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्यांमध्ये प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळेच इस्रायलविरुद्ध संताप व्यक्त करताना अनेकांनी 'ऑल आइज ऑन राफा' म्हणजेच संपूर्ण जगाचं लक्ष राफाकडे आहे असं इस्रायला सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
इन्स्टाग्रामवरील हे पॅम्पलेट व्हायरल झालं असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हे त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या पत्नीनेही म्हणजेच रितिका सजदेहने हे पॅम्पलेट शेअर केलेलं. मात्र तिच्यावर टीका झाल्यानंतर तिने ही पोस्ट डिलीट केली. मात्र रितीकाला ट्रोल करणारे मिम्स आणि व्हिडीओही व्हायरल झाले.
1)
She is the wife of Rohit Sharma ..Ritika Sajdeh ....
Never talk about Kashmiri pandits....
Never talk about Hindus in Pakistan and Bangladesh ...
But showing too much care about Palestine and Gaza#RishabhPant #RitikaSajdeh #AllEyesOnRafah #Gaza pic.twitter.com/fBBq5ILPp6
— The Intellectual (@SonuGup90911518) May 28, 2024
2)
Ritika Sajdeh pic.twitter.com/fODulCyUrG
— UmdarTamker (@UmdarTamker) May 28, 2024
भारतीय कलाकार आणि सेलिब्रिटी 'ऑल आइज ऑन राफा'चे पोस्ट शेअर करत असतानाच राहुल तेवतियाने त्याच्या इन्स्टाग्रामवर या कलाकारांवर कटाक्ष टाकणारी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एका टी-शर्टवरील वाक्याचा फोटो पोस्ट केला आहे. या टी-शर्टवर 'तुम्ही ज्या देशात राहता त्याला पाठिंबा द्या किंवा तुम्ही ज्या देशाला पाठिंबा देता तिथं जाऊन राहा,' असं लिहिलेलं आहे.
तेवतियाच्या या पोस्टचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता राहुलने लगावलेला हा टोला रितिकाला आहे की सर्वच सेलिब्रिटींना यासंदर्भातील चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
सोशल मीडियावरही अनेकांनी या ट्रेण्डवरुन भारतीय सेलिब्रिटींना ट्रोल केलं आहे. जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात तेव्हा हे सेलिब्रिटी काही बोलत नाहीत असं म्हटलं आहे.