मुंबई : आयसीसी वर्ल्ड कपच्या क्वालीफायर्स राऊंडला सुरुवात झाली आहे. टूर्नामेंटच्या पहिल्याच दिवशी अफगानिस्तान टीमचा युवा खेळाडू आणि कर्णधार राशिद खानने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
टूर्नामेंटमध्ये पहिला सामना अफगानिस्तान आणि स्कॉटलँडमध्ये होत आहे. पहिल्याच सामन्यामध्ये राशिद खानने एक अनोखा रेकॉर्ड बनवला आहे. राशिद खान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाक कमी वयाचा कर्णधार बनला आहे. राशिदचं वय 19 वर्ष 165 दिवस आहेत.
वर्ल्ड कप क्वालीफायर्समध्ये अफगानिस्तान प्रबळ दावेदार असल्याचं बोललं जातंय. पहिल्या सामन्यात अफगानिस्तानची सुरुवात इतकी चांगली नाही झाली.