'हा' प्लेयर धोनीला नाही मानत बेस्ट किपर

माजी पाकिस्तानी विकेटकिपर राशिद लतीफने महेंद्रसिंग धोनीचे तोंडभरून कौतूक केलं. पण तरीही माही हा बेस्ट किपर नाही असेही तो मानतो. त्याच्यामते  आफ्रिकेचा किपर हा बेस्ट किपर आहे. 

Pravin.Dabholkar Updated: Mar 15, 2018, 01:13 PM IST
 'हा' प्लेयर धोनीला नाही मानत बेस्ट किपर  title=

नवी दिल्ली : माजी पाकिस्तानी विकेटकिपर राशिद लतीफने महेंद्र सिंग धोनीचे तोंडभरून कौतूक केलं. धोनी असा खेळाडू आहे ज्याने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदललाय असं त्याने म्हटलं. पण तरीही माही हा बेस्ट किपर नाही असेही तो मानतो. त्याच्यामते  आफ्रिकेचा किपर हा बेस्ट किपर आहे. 

धोनीपेक्षा प्रभावी कोणी नाही   

७० आणि ८० च्या दशकात कपिल देवच्या यशानंतर भारताला छोट्या मोठ्या शहरातून खूप चांगले क्रिकेटर्स भेटले.

त्यामध्ये धोनीपेक्षा कोण प्रभावी नव्हतं. धोनी एक असा क्रिकेटर ज्याने टीम इंडियाला २ वर्ल्ड कप सहित ३ आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या.

एवढं कौतुक करूनही राशिद लतिफ माहीला बेस्ट विकेट किपर मानत नाही. लतीफ सध्या पाकिस्तान सुपर लीगमधील टीम कराची किंग्स चा मार्गदर्शक आहे. 

डि कॉक बेस्ट किपर 

धोनी सध्या जगातील बेस्ट किपर नाही असे लतीफ मानतो. मला वाटत जेफरी डुजोननंतर कॉक बेस्ट हा बेस्ट विकेटकिपर आहे.

डुजोनने ८० च्या दशकात वेस्ट इंडिजचे विकोटकिपर होते. तर क्विंटर डि कॉक सध्या साऊथ आफ्रिका टीमसाठी स्टंम्प्सच्या मागे जबाबदारी संभाळतोय.  

धोनी कूल 

लतीफ गल्फ न्यूजशी बोलत होता. महेंद्र सिंग धोनी क्रिकेटचा चांगला अॅंम्बासिटर आहे. केवळ भारतच नाही तर संपूर्ण क्रिकेटविश्वात तो बेस्ट आहे.

तो एक कूल व्यक्ती आहे. त्याच्या कॅप्टन्सीत टीमला चांगले यश मिळाले. तो माणूस म्हणूनही चांगला आहे, असेही लतीफ याने सांगितले.