मुंबई : टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री शुक्रवारी सोशल मीडियावर एका वेगळ्याच मूडमध्ये दिसून आले. त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केलेले फोटो एका पार्टीमधील असल्याचे दिसून येतायत. अशातच एक ट्विट आहे ज्या ट्विटची सगळीकडे चर्चा होताना दिसतेय. या ट्विटमध्ये रवी शास्त्रींनी एका युजरला रिप्लाय दिला आहे.
रवी शास्त्री यांनी #AskRavi हॅशटॅगने एक ट्विट केलं होतं. यात त्यांनी लिहिलं- 'आज मी चांगल्या मूडमध्ये आहे, तुम्ही मला काहीही विचारू शकता.'
यावर @bhayankarbatra नावाच्या युजरने त्यांच्या ट्विटवर कमेंट केली आहे. कमेंटमध्ये यूजरने रवी शास्त्री यांच्या स्केचसह लिहिले - 'सर, तुमचं हे स्केच 2 तास घेऊन तयार केलं आहे. कृपया उत्तर द्या. यावर रवी शास्त्री यांनी मजेशीर रिप्लाय दिला आहे.
Please mita de yaar
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) May 20, 2022
युजरच्या या कमेंटला उत्तर देताना रवी शास्त्रींनी लिहिलं 'प्लीज डिलीट कर यार...' खरं तर, स्केच पाहून हे कोणाचं आहे हे कळत नाहीये. अशा स्थितीत युजरला उत्तर देताना शास्त्री यांनी स्केच मिटवून टाकण्यास सांगितलं. दरम्यान शास्त्रींचं हे उत्तर पाहताच ते व्हायरल झालंय.