'मी सुन्न झालो, रोहित येरझाऱ्या घालत फोन करत होता...', राजकोट एमरजन्सीवर आश्विनने केला खुलासा, म्हणतो...

Ravichandran Ashwin Video : कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सपोर्टमुळे आश्विनला आईला पाहण्यासाठी चेन्नईला पोहोचता आलं. राजकोट टेस्टमध्ये नेमकं काय झालं होतं?

सौरभ तळेकर | Updated: Mar 12, 2024, 08:08 PM IST
'मी सुन्न झालो, रोहित येरझाऱ्या घालत फोन करत होता...', राजकोट एमरजन्सीवर आश्विनने केला खुलासा, म्हणतो... title=
Ravichandran Ashwin, Rohit Sharma, rajkot Test Emergency

Ravichandran Ashwin On Rohit Sharma : राजकोट टेस्टमधून टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर आश्विन (Ravichandran Ashwin) याने काढता पाय घेतला होता. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अश्विनच्या आईची प्रकृती खालावल्याची माहिती दिली होती. राजकोट टेस्ट (Rajkot Test Emergency) सुरू असताना आश्विनला मॅच सोडून चेन्नईला जावं लागलं होतं. आश्विनसाठी हा संकटाचा काळ होता. मात्र, कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सपोर्टमुळे आश्विनला आईला पाहण्यासाठी चेन्नईला पोहोचता आलं. राजकोट टेस्टमध्ये नेमकं काय झालं होतं? घरुन फोन आल्यावर आश्विनची अवस्था कशी होती? यावर त्याने स्वत: खुलासा केला आहे.

काय म्हणाला आर आश्विन?

मला घरून फोन आल्यानंतर मला रहावत नव्हतं. मला कसंही आईकडे जायचं होतं. मला तिला बघायचं होतं. मी डॉक्टरांना विचारलं, आई कशी आहे? तेव्हा डॉक्टर म्हणाले, आता त्या पाहण्याच्या स्थितीत नाहीत. डॉक्टरांचे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तेव्हा राजकोटवरून फ्लाईट बघत होतो. पण एकही फ्लाईट उपलब्ध नव्हती. राजकोट एअरपोर्ट संध्याकाळी 6 वाजता बंद होतं. त्यानंतर एकही फ्लाईट नव्हती. मला काय करावं सुचत नव्हतं.

रोहित आणि राहुल भाई माझ्या रुममध्ये आले. तू जास्त विचार करू नको आणि आईकडे जा, असं सरळ शब्दात सांगितलं. रोहित माझ्यासाठी चार्टर फ्लाईट अरेंज करण्यात व्यस्थ झाला. रोहितने कमलेशला फोन केला. ते दोघंही फोन करुन माझ्यासाठी जाण्याची व्यवस्था करत होते. रात्रीचे 9.30 वाजता त्यांनी माझ्यासाठी घडपड केली. मी पूर्णपणे भान हरपलो होतो, कारण माझ्यासाठी दोन लोक व्यवस्था करत होते. मी त्याच्या जागी असतो, मी कॅप्टन म्हणून एका खेळाडूसाठी असं केलं असतं का? असा विचार माझ्या डोक्यात आला.

रोहित शर्मा खरोखर एक ग्रेट कॅप्टन आहे. मी अनेक कॅप्टनच्या अंडर खेळलोय, पण रोहित शर्मामध्ये अशी काहीतरी गोष्ट आहे, जी त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते. तो साफ मनाचा आहे. रोहितने नक्कीच 5 वेळा आयपीएल ट्रॉफी उचलली आहे. धोनीने देखील उचलली पण रोहितमध्ये वेगळी गोष्ट आहे. त्याने त्यासाठी वेगळे कष्ट नक्कीच घेतले आहेत, असं आर आश्विनने म्हटलं आहे.