ट्वीट वॉरनंतर मांजरेकर आणि जडेजा पहिल्यांदाच आमने-सामने, VIDEO तुफान व्हायरल

रविंद्र जडेजा आणि संजय मांजरेकर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Updated: Aug 29, 2022, 03:25 PM IST
ट्वीट वॉरनंतर मांजरेकर आणि जडेजा पहिल्यांदाच आमने-सामने, VIDEO तुफान व्हायरल title=

Asia cup 2022 : भारतीय टीमने आशिया कप 2022 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला. भारताने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला. सामन्यानंतर भारतीय संघाने सेलिब्रेशन केलं. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण या सोबतच  आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत असून जोरदार चर्चेत देखील आहे. 

संजय मांजरेकर आणि रवींद्र जडेजा यांचा व्हिडिओ सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. संजय मांजरेकर सामन्यानंतर रवींद्र जडेजा सोबत इंटरव्यू करणार होता. पण इंटरव्यू आधी संजय मांजरेकर पहिला प्रश्न असा केला की सगळ्यांनाच हसू सुटलं.

2019 मध्ये सोशल मीडियावर संजय मांजरेकर आणि रवींद्र जडेजा यांच्यात जोरदार ट्वीट वॉर रंगलं होतं. त्यामुळे अनेक दिवस ते चर्चेत राहिले. पण भारत-पाकिस्तान सामन्यानंतर ते समोरासमोर आले तेव्हा चित्र काही वेगळं होतं. संजय मांजरेकरने पहिला प्रश्न केला की, माझ्यासोबत बोलण्यास तुला काही अडचण तर नाही ना? या प्रश्नावर रवींद्र जडेजाने देखील हसत उत्तर दिलं. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेत असून अनेक जण तो शेअर करत आहेत. सामन्यानंतर संजय मांजरेकर यांनी रवींद्र जडेजाचं कौतूक देखील केलं.

रवींद्र जडेजाने 29 बॉलमध्ये 35 रन केले. ज्यामध्ये 2 फोर आणि 2 सिक्सचा समावेश आहे. त्याला चौथ्या स्थानावर खेळण्याची संधी दिली होती. ज्याचा रवींद्र जडेजाने चांगला फायदा घेतला. रवींद्र जडेजा मैदानात आला तेव्हा भारताला जिंकण्यासाठी 34 बॉलमध्ये 59 रनची गरज होती. 

रवींद्र जडेजाने हार्दिक पांड्या सोबत चांगली पार्टनरशिप केली. पण शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजा आउट झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याने विजय मिळवून दिला.