Ravindra Jadeja इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करतो, ऑस्ट्रेलियाशी खास कनेक्शन

Ravindra Jadeja following Nathan Lyon : टीम इंडियाचा स्पिनर रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja)इन्स्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र तो या फॉलोअर्सपैकी एकाही व्यक्तीला फॉलो करत नव्हता. पण आता त्याने एका व्यक्तीला फॉलो करायला सुरुवात केली आहे. अनेकांना ही व्यक्ती त्याची पत्नी रिवाबा वाटले असेल,मात्र तसे नाही आहे.

Updated: Feb 20, 2023, 04:29 PM IST
Ravindra Jadeja इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करतो, ऑस्ट्रेलियाशी खास कनेक्शन title=

Ravindra Jadeja following Nathan Lyon : टीम इंडियाचा स्टार स्पिनर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) टेस्ट सामन्यामध्ये धुमाकूळ घातला आहे. दिल्लीत रंगलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात एकट्याने 7 विकेट काढल्या होत्या. या विकेटस् घेऊन त्याने टीम इंडियाच्या (Team India) विजयाचा पाया रचला होता. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात रवींद्र जडेजाची चर्चा रंगली होती. त्याचसोबत आता जडेजाच्या इन्स्टाग्रामचा एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या स्क्रिनशॉटमध्ये तो एका व्यक्तीला फॉलो करत असल्याचे दिसत आहे. हा व्यक्ती कोण आहे? ते जाणून घेऊयात. (ravindra jadeja following nathan lyon for just 24 hours in instagram story screenshot viral ind vs aus test) 

 

हे ही वाचा :  'के एल राहूलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडावं...', माजी क्रिकेटरचे मोठं विधान  

 
टीम इंडियाचा स्पिनर रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja)इन्स्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र तो या फॉलोअर्सपैकी एकाही व्यक्तीला फॉलो करत नव्हता. पण आता त्याने एका व्यक्तीला फॉलो करायला सुरुवात केली आहे. अनेकांना ही व्यक्ती त्याची पत्नी रिवाबा वाटले असेल,मात्र तसे नाही आहे. जडेजाने रविवारी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनला (Nathan Lyon) फॉलो केले. फक्त 24 तासासाठी तो नॅथन लायनला फॉलो करत असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. 

जड्डूच्या स्टोरीमध्ये काय? 

रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीमध्ये त्याने इंस्टाग्राम प्रोफाईला स्क्रिनशॉट शेअर केला होता. या स्टोरीमध्ये त्याने माझा मित्र नॅथन लियॉनला (Nathan Lyon) 24 तास फॉलो करत असल्याचे त्याने म्हटले होते. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूने नॅथन लियॉनने देखील जडेजाच्या इन्स्टा स्टोरीचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो स्वत:च्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला होता. 

असे रंगले दोन कसोटी सामने 

चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत भारताने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने नागपुरातील पहिली कसोटी एक डाव आणि 132 धावांनी जिंकली आणि नवी दिल्लीतील दुसरी कसोटी 6 गडी राखून जिंकली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाला या मालिकेत आतापर्यंत रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या भारतीय फिरकी जोडीने पराभूत केले आहे.

दरम्यान बीसीसीआयने (BCCI)रविवारी तिसर्‍या आणि चौथ्या कसोटी तसेच तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.यामध्ये केएल राहुलला वगळले जाईल अशी अपेक्षा होती, पण तो संघात कायम आहे, पण त्याच्याकडून उपकर्णधारपद हिरावून घेतले आहे, अशी माहिती आहे.