थँक्यू डीके..! आरसीबीकडून Dinesh Karthik ला 'गार्ड ऑफ ऑनर', आयपीएलला ठोकला रामराम

Dinesh Karthik IPL Retirement : गेली 17 वर्ष आपल्या फलंदाजीतून मनोरंजन करणाऱ्या दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. एलिमिनेटर सामन्यापूर्वी आयसीबी संघाने डीकेला गार्ड ऑफ ऑनर (guard of honours) दिला.

सौरभ तळेकर | Updated: May 23, 2024, 12:39 AM IST
थँक्यू डीके..! आरसीबीकडून Dinesh Karthik ला 'गार्ड ऑफ ऑनर', आयपीएलला ठोकला रामराम title=
Dinesh Karthik IPL Retirement

RCB team giving guard of honours to Dinesh Karthik : राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात आरसाबीचा 5 विकेट्सने पराभव केला अन् क्वालिफायर-2 चं तिकीट मिळवलं आहे. गेल्या 17 वर्षांचं आरसीबीचं स्वप्न यंदाच्या वर्षी देखील पूर्ण करता आलं नाही. अशातच आता आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा स्टार फिनिशर दिनेश कार्तिक याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होईल. आजच्या सामन्यानंतर आरसीबीने दिनेश कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर दिला.

दिनेश कार्तिक 2008 पासून आयपीएल खेळतोय आणि आत्तापर्यंत कार्तिक दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, गुजरात लायन्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरकडून आयपीएल खेळला आहे. अनेकदा दिनेश कार्तिकने सामने खेळले तर तो कधी समालोचन करण्यासाठी आला. पण वयाच्या 42 व्या वर्षी देखील डीकेने मैदान सोडलं नाही. तो संधी मिळेल तेव्हा संघात आला अन् सर्वांचं मनोरंजन केलं. 

दिनेश कार्तिकची आयपीएल कारकीर्द

दिनेश कार्तिकने एकूण 257 सामने खेळले असून त्याने एकूण 4842 धावा केल्या आहेत. 26.32 च्या सरासरीने डीकेने एकूण 22 अर्धशतक ठोकले आहेत. दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये 161 षटकार आणि 466 चौकार ठोकले आहेत. विकेटकिपींगमध्ये देखील दिनेशने उत्तम कामगिरी केलीये. त्याने 145 कॅच आणि 37 स्टंपिंग केल्या आहेत.

डीकेची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

सप्टेंबर 2004 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कार्तिकने सतत संघात आणि बाहेर ठेवले. त्याने भारतासाठी 26 कसोटी, 94 एकदिवसीय आणि 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 1025, 1752 आणि 686 धावा केल्या आहेत. पुढील महिन्यात 39 वर्षांची होणारा दिनेश कार्तिकने ऑस्ट्रेलियातील 2022 टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून बांगलादेशविरुद्ध शेवटचा सामना खेळला आहे.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार ), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.