मॅच हातून जाताच धोनीचा पारा चढला, या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

बंगळुरू टीमने चेन्नई विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये 13 धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या हातून सामना खेचून आणल्याचा आनंद बंगळुरू टीमला आहे. 

Updated: May 5, 2022, 07:38 AM IST
मॅच हातून जाताच धोनीचा पारा चढला, या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर title=

मुंबई : बंगळुरू विरुद्ध चेन्नई आयपीएलमधील 49 वा सामना पुण्यात झाला. हा सामना जिंकणं चेन्नईसाठी खूप महत्त्वाचं होतं. हातात असलेली मॅच अखेरच्या क्षणी गमवल्याने कॅप्टन कूल धोनी संतापला. त्याने पराभवाचं खापर आपल्या टीममधील खेळाडूवर फोडलं आहे. 

बंगळुरू टीमने चेन्नई विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये 13 धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या हातून सामना खेचून आणल्याचा आनंद बंगळुरू टीमला आहे. चेन्नईने 174 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना 8 विकेट्स गमवून 160 धावा केल्या. 

चेन्नई टीम प्लेऑफमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. तर बंगळुरूला या विजयाने मोठा फायदा होणार आहे. कॅप्टन कूल धोनी या मॅचनंतर संतापल्याचं पाहायला मिळालं. 

महेंद्रसिंह धोनी फलंदाजांवर संतापला होता. फलंदाजांनी अत्यंत वाईट आणि निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे टार्गेट पूर्ण करता आलं नाही. टीमने पॉईंट टेबलवरील आकड्यांकडे नाही तर टार्गेटकडे लक्ष द्यायला हवं असंही धोनी म्हणाला.