मुंबई : बंगळुरू विरुद्ध चेन्नई सामना आज होत आहे. चेन्नईनं आतापर्यंत एकही सामना जिंकला नाही. रविंद्र जडेजाच्या हाती कर्णधारपदाची कमान आल्यानंतर एकही सामना जिंकला नाही. बंगळुरूने 4 पैकी 1 सामना गमवला आहे तर 3 जिंकले आहेत. बंगळुरू विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज आहे.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडही या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसणार आहे. जोश हेजलवूडला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये चेन्नई आणि बंगळुरू 29 वेळा आमनेसामने आले आहेत.
या 29 पैकी चेन्नईने 19 सामने जिंकले आहेत. तर बंगळुरूने त्यांच्या खात्यात फक्त 9 सामने जिंकले आहेत. दोन्ही टीममधल्या गेल्या 12 सामन्यांमध्ये आरसीबीने केवळ दोनच विजय मिळवला.तर 10 सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
बंगळुरू टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन: फॉफ डु प्लेसी (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, जोश हेजलवुड, वानिन्दु हसरंगा, सिद्धार्थ कौल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
चेन्नई टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर), ड्वेन ब्रावो, क्रिस जॉर्डन, राजवर्धन हैंगरगेकर आणि ड्वेन प्रिटोरियस