IPL 2022 | विराट कोहलीची धमाकेदार खेळी, गुजरातवर 8 विकेट्सने 'रॉयल' विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. 

Updated: May 19, 2022, 11:34 PM IST
IPL 2022 | विराट कोहलीची धमाकेदार खेळी, गुजरातवर 8 विकेट्सने 'रॉयल' विजय title=

मुंबई :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. गुजरातने विजयासाठी 169 धावांचे दिलेले आव्हान आरसीबीने 8 बॉल आणि 8 विकेट्स राखून पूर्ण केलं. या विजयासह आरसीबीने प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. (rcb vs gt ipl 2022 royal challengers bangalore win by 8 wickets against gujrat titans) 

विराट कोहली आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला. विराटने 73 धावांची अर्धशतकी खेळी केली. कॅप्टन फाफ डु प्लेसिसने 44 धावांची संयमी खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 40 धावा करत आरसीबीला विजयापर्यंत पोहचवलं. गुजरातकडून राशिद खानने 2 विकेट्स घेतल्या. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची प्लेइंग इलेव्हन : फाफ डुप्लेसी (कॅप्टन) विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरुर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, सिद्धार्थ कौल आणि जॉश हेझलवुड. 

गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, रविकृष्णन साई किशोर, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल आणि मोहम्मद शमी. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x