Rishabh Pant Car Accident: शुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) चा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तो गंभीर जखमी (Rishabh Pant injured in car accident) झाला असून सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार (Hospital Treatment) सुरु आहेत. गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर काच फोडून ऋषभ बाहेर आल्याची माहिती आहे. दरम्यान यावेळी अपघात घडल्यानंतरच्या काही क्षणांचा व्हिडीओ (Rishabh Pant Car Accident Video) समोर आला आहे. ज्यामध्ये पंत रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय.
सध्या ऋषभ पंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. व्हिडीओमध्ये पंतने अंगावर चादर लपेटलेली दिसतेय. शिवाय तो मदत करणाऱ्या व्यक्तीशी काहीतरी बोलताना दिसतोय.
#RishabhPant accident : first video after accident...Pant seen bleeding #GetwellSoon #Roorkee pic.twitter.com/Kr2jplLpd6
— Sonu Kanojia (@NNsonukanojia) December 30, 2022
ऋषभ पंतने सांगितल्यानुसार, त्याला गाडी चालवताना डुलकी लागली. यामुळे गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि ती डिवायडरला जाऊन आदळली. ऋषभ पंत दिल्लीवरून रूडकीला जात होता. यावेळी एका बस ड्रायव्हरने त्याला अॅम्ब्युलन्स बोलावून हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. यानंतर त्याला देहरादूनला पाठवण्यात आलं.
पंतच्या अपघातानंतर त्याची गाडी आणि त्याचे रूग्णालयातील फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. यासोबत आता त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ज्यामुळे पंतच्या डोक्याला मार लागलेला असून चेहरा संपूर्ण रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय. शिवाय त्याच्या गाडीचा अपघात होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही (Rishabh Pant Car Accident CCTV Footage) समोर आलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येतंय की, गाडी भरधाव वेगाने येऊन डिव्हायडरला आदळते.
पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, "क्रिकेटर ऋषभ पंत आर्थोपेडिक्स आणि प्लास्टिक सर्जनच्या देखरेखीखाली आहेत. सध्या त्याची तब्येत स्थिर आहे. त्याच्या तब्येतीची पूर्ण माहिती घेतल्यानंतर मेडिकल बुलेटीन काढलं जाईल. त्यानंतर पुढे काय करायचं निर्णय घेता येईल."
सुशील कुमार या बस ड्रायव्हरने पंतचा जीव वाचवला. यावेळी एका वेबसाईटशी बोलताना सुशील कुमार यांनी सांगितलं की, "मी हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर असून हरिद्वारला जात होतो. यावेळी दिल्लीकडे जाणारी एक गाडी 60-70 च्या स्पिडने डिव्हायरला आदळली. ती गाडी आम्हाला टक्कर देणार असल्याचं लक्षात आल्यावर मी त्वरित गाडी फर्स्ट लाईनमध्ये काढली."
बस ड्रायव्हरने पुढे सांगितलं की, त्यानेच आम्हाला सांगितलं की, तो ऋषभ पंत आहे. त्याचे पैसे देखील पडले असल्याचं त्याने सांगितलं. त्यावेळी आम्ही आसपास पडलेले 7-8 हजार रूपये एकत्र करून त्याला दिले. यावेळी माझ्या कंडक्टरने अॅम्ब्युलन्सला फोन केला. 15-20 मिनिटांत अॅम्ब्युलन्स आली आणि आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. तो पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता आणि लंगडत चालत होता. आम्हाला त्यावेळी व्हिडीओ काढण्यापेक्षा त्याचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं वाटलं.