Rishabh Pant ला उर्वशी रौतेलाकडून खास बर्थडे गिफ्ट! Video शेअर करत केलं Kiss

भारतीय संघाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh Pant) 4 ऑक्टोबरला वाढदिवस असतो. मंगळवारी ऋषभ पंतला 25 वर्षे पूर्ण झाली असून 26 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. 

Updated: Oct 4, 2022, 01:30 PM IST
Rishabh Pant ला उर्वशी रौतेलाकडून खास बर्थडे गिफ्ट! Video शेअर करत केलं Kiss title=

Rishabh Pant Birthday And Wish By Urvashi Rautela: भारतीय संघाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh Pant) 4 ऑक्टोबरला वाढदिवस असतो. मंगळवारी ऋषभ पंतला 25 वर्षे पूर्ण झाली असून 26 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. वाढदिवसानिमित्त क्रीडा जगतातील दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मैत्रिण ईशा नेगी हिनेही रोमँटिक अंदाजात ऋषभ पंतला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हीने दिलेल्या शुभेच्छा चर्चेत आहेत. तिने शेअर केलेल्या व्हिडीओत कोणाचंही नाव घेतलेलं नाही. ऋषभ पंतचा बर्थडे (Rishabh Pant Birthday) आणि तिने शेअर केलेला व्हिडीओचं टायमिंग पाहता नेटकऱ्यांनी अंदाज बांधला आहे. उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

उर्वशी रौतेला हीने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'Happy Birthday'. तसेच व्हिडीओमध्ये रेड ड्रेसमध्ये दिसत असून तिचे एक्सप्रेशन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. अवघ्या काही सेकंदात गिफ्ट म्हणून एक फ्लाईंग किस देते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओखाली नेटकरी आपल्या अंदाजात प्रतिक्रिया नोंदवत आहेत. उर्वशीच्या पोस्टवर एका युजर्सने लिहिलं आहे की, 'वहिनी ऋषभ भाऊचा बर्थडे'. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की 'हॅप्पी बर्थडे मिस्टर RP17. समजतंय ना'. 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान सामना झाला तेव्हा उर्वशी रौतेला सामना पाहण्यासाठी पोहोचली होती. मात्र त्यावेळी ऋषभचा प्लेईंग 11 मध्ये समावेश नव्हता. त्यामुळे नेटकऱ्यांनी दोघांची खिल्ली उडवली होती.