भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मात्र पंत हा त्याच्या खेळामुळे नाही तर बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या (Urvashi Rautela) गेल्या काही दिवसांतील सोशल मीडियावरील (Social Media) पोस्टमध्ये जोरदार चर्चेत आहे. उर्वशी रौतेला ऋषभ पंतच्या प्रेमात पडली असल्याचे चाहत्यांना वाटत आहे. तशी चर्चाही सोशल मीडियावर होत आहे. मात्र याआधी पंत आणि उर्वशी यांच्यात सोशल मीडियावर जोरदार खडाजंगी झाल्याचेही पाहायला मिळालं आहे. (Rishabh Pant fans trolled Urvashi Rautela for sharing a new photo on social media)
यावेळी उर्वशी रौतेलाने पंतबद्दल (Rishabh Pant) केलेल्या वक्तव्यावरुन तिला सतत ट्रोलही केले जात आहे. 2022च्या टी-20 वर्ल्डकप (T20 world cup 2022) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाला (australia) पोहोचला आहे. यानंतर उर्वशीनेही (Urvashi Rautela) सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला पोहोचल्याची माहिती दिली होती. उर्वशीच्या पोस्टनंतर पुन्हा तिला ट्रोल करण्यात आलं होतं.
मात्र आता पुन्हा उर्वशीने (Urvashi Rautela) इंस्टाग्रामवर एक नवीन फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने साडी नेसलेली आहे आणि भांगेत कुंकूही भरलेले आहे. हा फोटो शेअर करत रौतेलाने कॅप्शनमध्ये, “प्रेम में पड़ी प्रेमिका को, सिन्दूर से प्रिय कुछ नहीं होता !! सारी रस्म रिवाज़ के साथ चाहिए, उम्रभर का साथ पिया तुमसे”, असे म्हटलं आहे.
दरम्यान, उर्वशीने या पोस्टमध्ये कुठेही ऋषभ पंतचा (Rishabh Pant) उल्लेख केलेला नसला तरी चाहते मात्र ही पोस्ट केवळ त्याच्यासाठीच असल्याचे म्हणत आहेत. एका युजरने या फोटोवर, 'कृपया पंतला वर्ल्ड कपसाठी सोड,' असे म्हटलं आहे. तर आणखी एका युजरने, 'वर्ल्ड कपनंतर आम्ही लग्न लावून देऊ, पण त्याचे लक्ष विचलित करु नको,' असे म्हटलं आहे.
दरम्यान, आधीही उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो पोस्ट करताना टाकलेल्या कॅप्शनमुळे ऋषभ पंतची (rishabh pant) आठवण झाली होती. मी तुझी वाट पाहू की तुझ्या सारखीच वागू अशा आशयाचे कॅप्शन उर्वशीने (Urvashi Rautela) आपल्या फोटोला दिलं होतं. फोटोच्या कॅप्शनमध्ये उर्वशीने लव्ह उर्वशी असा हॅश टॅग दिला आहे. फोटोंमध्ये उर्वशी जवळच गुलाबाचा पुष्पगुच्छ घेऊन बसलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत आहे.