पंतच्या कुटुंबात नव्या व्यक्तीची एन्ट्री, गर्लफ्रेंड की होणारी पत्नी?

ऋषभ पंतच्या कुटुंबासोबत दिसली नवी व्यक्ती? गर्लफ्रेंड की होणारी पत्नी?

Updated: Apr 30, 2022, 04:10 PM IST
पंतच्या कुटुंबात नव्या व्यक्तीची एन्ट्री, गर्लफ्रेंड की होणारी पत्नी? title=

मुंबई : दिल्ली विरुद्ध कोलकाता गुरुवारी झालेल्या सामन्यात पंतच्या कुटुंबासोबत एक खास व्यक्ती दिसली. वानखेडे स्टेडियममध्ये ती खास व्यक्ती दिसली आणि सोशल मीडियावर वावड्या उठल्या. या तरुणीचं नाव ईशा नेगी असल्याची माहिती मिळाली आहे. 

दिल्लीचा कर्णधार पंतच्या बहिणीसोबत तरुणी दिसली. तिची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या तरुणीचं नाव ईशा नेगी आहे. ईशा देहरादूनची रहिवासी आहे. ती इंटीरिअर डिझायनिंग करते.

ईशा नेगी सोशल मीडियावर तुफान अॅक्टीव्ह असते. आपल्या चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते. ती आणि ऋषभ पंत एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही आहेत. मात्र ऋषभने अजून कोणतंही अधिकृत व्यक्तव्य यावर केलं नाही. 

ईशाने एमिटी यूनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे. ईशाचे 1 लाख  86 हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिला साहित्य आणि दर्शनशास्त्राची आवड आहे. ईशा नेगीआधी उर्वशी रौतेलासोबत ऋषभ पंतचं नाव जोडलं होतं. अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि पंत डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.