भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबर पासून टेस्ट सिरीज आणि त्यानंतर टी 20 सिरीज खेळवली जाणार आहे. अजून बांगलादेश विरुद्ध सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली नसून यापूर्वी टीम इंडियाचे स्टार खेळाडू देशांतर्गत लीग तसेच सिरीजमध्ये खेळताना दिसत आहेत. सध्या दिल्ली प्रीमियर लीगला सुरुवात झाली असून याचा पहिला सामना 17 ऑगस्ट रोजी जुनी दिल्ली 6 आणि दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स यांच्यात खेळवण्यात आला. यात भारताचा विकटकीपर फलंदाज ऋषभ पंत हा विकेटकिपिंग सोडून बॉलिंग करताना दिसल्याने सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे.
जुनी दिल्ली 6 या टीमचं नेतृत्व ऋषभ पंत करत होता, यावेळी शेवटच्या ओव्हरला तो विकेटकिपिंग सोडून थेट गोलंदाजी करण्यासाठी आला. ऋषभच्या ओव्हरने मॅचच्या निकालावर काहीही परिणाम होणार नव्हता. कारण शेवटच्या बॉलवर समोरच्या टीमला केवळ एकचं धाव हवी होती. ऋषभने टाकलेल्या बॉलवर फलंदाजाने शॉट मारला आणि एक धाव घेतली. ज्यामुळे पहिल्या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स यांचा विजय झाला तर ऋषभ पंतच्या जुनी दिल्ली 6 ला पराभवाला सामोरे जावे लागेल.
जुनी दिल्ली 6 आणि दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स यांच्यात झालेल्या मॅचमध्ये दक्षिण दिल्ली सुपरस्टार यांनी टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर ऋषभ पंतच्या टीमला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले. ऋषभ पंतने या मॅचमध्ये 32 बॉलमध्ये 35 धावा केल्या, या दरम्यान त्याने 4 चौकार आणि 1 षटकार ठोकला. जुनी दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 197 धावांची कामगिरी केली. तर दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स टीमने 19. 1 ओव्हरमध्ये 198/ 7 धावा करून विजय मिळवला.
Rishabh pant bowling pic.twitter.com/QvM7tFZLcu
— (@twitfrenzy_) August 17, 2024
ऋषभ पंतला अचानक विकटकिपिंग सोडून बॉलिंग करताना पाहिल्यावर त्याच्यावर टीम इंडियाचा नवा हेड कोच गौतम गंभीरचा प्रभाव पडल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी 20 सिरीज खेळवली गेली. या सीरिजच्या तिसऱ्या मॅचमध्ये गंभीरच्या सांगण्यावरून सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह यांनी बॉलिंग केली. यात सूर्यकुमारला विकेट घेण्यात यश सुद्धा आले.