Ind vs Ban : भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यामध्ये आज पहिला वनडे (IND vs BAN 1st ODI) सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाला (Team India) चांगला खेळ करता आला नाही. दरम्यान आजच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या कॅम्पमधून एक वाईट गोष्ट समोर आली. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (IND vs BAN Live Score 1st ODI) या वनडे सामन्यांच्या तिन्ही सामन्यांमधून बाहेर पडला आहे. यामुळे टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे.
बीसीसीआयने सकाळी प्रेस नोट काढून याबाबत अपडेट दिलं आहे. मुख्य म्हणजे ऋषभ पंतला टीमबाहेर का करण्यात आलं याचं कारण अजून समोर आलेलं नाही. मात्र बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, त्याला मेडिकल टीमच्या सांगण्यावरून रिलीज करण्यात आलंय. पंत टीममध्ये नसल्याने के.एल राहुलला विकेटकीपिंगची जबाबदारी देण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या प्रेस नोटमध्ये नमूद केल्यानुसार, बीसीसीआयच्या मेडिकल टीमशी सल्लामसलत केल्यानंतर ऋषभ पंतला वनडे टीममधून रिलीज करण्यात आलं आहे. तो टेस्ट सिरीजसाठी उपलब्ध असणार आहे. त्याच्या जागी कोणालाही रिप्लेमेंट म्हणून ठेवण्यात आलेलं नाही. तर अक्षर पटेल पहिल्या वनडे सामन्यासाठी उपलब्ध नाही.
ऋषभ पंतचा गेल्या काही दिवसांपासून खेळही चांगला होताना दिसत नाहीये. ऋषभ पंतला टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये झिम्बाब्वे आणि इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हेनमध्ये संधी देण्यात आली होती. मात्र दोन्ही सामन्यांमध्ये त्याला केवळ 9 रन्स करणं शक्य झालं. याशिवाय न्यूझीलंड दौऱ्यावर देखील त्याने चाहत्यांना निराश केलं.
आजच्या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या सामन्यात भारताकडून कुलदीप सेनला डेब्यूची संधी देण्यात आली. कुलदीपने आयपीएल 2022 मध्ये चांगला खेळ दाखवला आहे, ज्यामुळे तो चर्चेत होता, अखेर त्याला टीममध्ये संधी देण्यात आली.
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.
लिटन दास (कर्णधार), अनामुल हक, नजमुल हुसैन शंतो, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमूदुल्लाह, अफीफ हुसैन, मेहदी हसन मिराज, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, इबादत हुसैन.