IND vs ENG : इंग्लंडविरूद्धच्या पराभवानंतर Rohit Sharma ला अश्रू अनावर, दाटून आला कंठ!

इंग्लंडने (England) 10 विकेट्ने भारताचा पराभव केला. या पराभवाने सर्व भारतीय चाहते निराश झाले आहेत. तर कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) देखील अश्रू अनावर झाले.

Updated: Nov 10, 2022, 04:59 PM IST
IND vs ENG : इंग्लंडविरूद्धच्या पराभवानंतर Rohit Sharma ला अश्रू अनावर, दाटून आला कंठ! title=

IND vs ENG Semi-Final : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपमधून (T20 world cup) टीम इंडियाचा (Team india) प्रवास आज संपलाय. इंग्लंडविरूद्ध झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. इंग्लंडने (England) 10 विकेट्ने भारताचा पराभव केला. या पराभवाने सर्व भारतीय चाहते निराश झाले आहेत. तर कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) देखील अश्रू अनावर झाल्याचं कॅमेरात कैद झालंय. 

16 व्या ओव्हरमध्ये इंग्लंडने भारताने दिलेलं 169 रन्सचं लक्ष्य पूर्ण केलं. या पराभवामुळे टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न यावर्षीही भंगलं आहे. 13 नोव्हेंबर रोजी इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान यांच्यात फायनलचा सामना रंगणार आहे. 

इंग्लंडने तुफान फलंदाजी करत भारताला धूळ चारली. 24 बॉल्स आणि 10 विकेट्स राखून इंग्लंडने भारताचा धुव्वा उडवला आहे. या सामन्यात अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. हेल्सने 47 बॉल्समध्ये 86 तर 49 बॉल्समध्ये 80 रन्सची नाबाद खेळी करत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारलीये. यावेळी टीम इंडियाचे गोलंदाज पुन्हा एकदा फेल गेले. भारताच्या गोलंदाजांना एकंही विकेट काढता आली नाही.

दुसऱ्या सेमी फायनलचा टॉस इंग्लंडचा (England) कर्णधार जोस (Jos Buttler) जिंकला आहे. इंग्लंडने प्रथम फिल्डींग करत टीम इंडियाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. इंग्लंडने प्रथम फिल्डींग करत टीम इंडियाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 168 रन्स केले. इंग्लंडला जिंकण्यासाठी 169 रन्सची आवश्यकता होती. 

आजच्या सामन्यात पुन्हा एकदा किंग विराट कोहलीची बॅट तळपळी. या सामन्यात विराटने शानदार हाफ सेंच्युरी झळकावली. तर हार्दिक पांड्यानेही त्याला यावेळी साथ दिली. मात्र त्यांना मोठा स्कोर उभारता आला नाही त्यामुळे भारताचा पराभव झाला.