Rohit sharma : माझ्यामते संपूर्ण टीमने...; शून्यावर बाद होऊनही हिटमॅन स्वतःची चूक मानेना!

Rohit sharma : आजच्या सामन्यात मुंबईला चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागलाय. अशातच स्वतः शून्यावर बाद होऊनही पराभवाचं खापर रोहितने संपूर्ण टीमवर फोडलंय 

Updated: May 6, 2023, 09:10 PM IST
Rohit sharma : माझ्यामते संपूर्ण टीमने...; शून्यावर बाद होऊनही हिटमॅन स्वतःची चूक मानेना! title=

Rohit sharma : आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) आज दुपारी चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्स वानखेडेवर (Wankhede Stadium) झालेल्या पराभवाचा बदला घेऊ शकली नाही. चेन्नईने 6 विकेट्सने मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) पराभव केला. दरम्यान या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit sharma ) केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

पराभवानंतर काय म्हणाला रोहित?

पोस्ट प्रेझेंटनेशनमध्ये रोहित शर्मा ( Rohit sharma ) म्हणाला की, "मला वाटतं की, संपूर्ण टीमने प्रत्येक ठिकाणी चूक केली. यावेळी आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. गोलंदाजांनी रोखावं यासाठी आम्ही पुरेसे रन्स केले नाही. एकंदरीत आमची फलंदाजी आज खूप वाईट झाली." यावेळी रोहित शर्माने ( Rohit sharma ) स्वतः शून्यावर बाद होऊनही पराभवाची जबाबदारी न स्विकारता टीमला जबाबदार ठरवल्याने चाहत्यांना ही गोष्ट खटकलेली दिसली.

हिटमॅन पुढे म्हणाला की, पियुष चावलाने ( Piyush Chawla ) खरंच खूप चांगली गोलंदाजी करत असून इतर गोलंदाजांनी त्याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. मुळात टीमला याच गोष्टीची गरज आहे. यासाठी सर्वांना पुढाकार घ्यावा लागेल आणि त्यासाठी योगदान द्यावं लागेल. 

होमग्राऊंडवरील सामन्यांबाबत बोलताना रोहित ( Rohit sharma ) म्हणाला, यंदाच्या सिझनमध्ये होम ग्राऊंडचा फायदा होताना दिसत नाहीये. कोणीही होमग्राऊंडवर विजय मिळतंय, तर पराभूतंही होतायत. आपल्याला खेळाच्या तिन्ही विभागांना मजबूत करण्याची गरज आहे. 

मुंबईचा 6 विकेट्सने पराभव

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या ( Mumbai Indians ) खेळांडूनी फारच खराब कामगिरी केली. 20 ओव्हरमध्ये मुंबईच्या टीमने 8 विकेट्स गमावून 139 रन्स केले. मुंबईकडून सर्वाधिक नेहल वढेराने 51 बॉल्समध्ये 64 रन्सची खेळी केली.  यावेळी मुंबईने चेन्नईच्या टीमला 140 रन्सचं सहज आव्हान दिलं.

मुंबईने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना चेन्नईच्या टीमची सुरुवात चांगली झाली. गायकवाड बाद झाल्यानंतर मराठमोळा अजिंक्य रहाणे मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती, मात्र 21 रन्स करून तो ही बाद झाला. कॉन्वे आणि धोनी क्रिजवर असताना दोघांनी टीमला विजय मिळवून दिला. कॉन्वेने चेन्नईकडून सर्वाधिक म्हणजेच 44 रन्स केले.